INFORMATION MARATHI

Dr Babasaheb Ambedkar Information In Marathi

  • जन्मदिवस - १४ एप्रिल १८९१
  • जन्मठिकाण - महू (म.प्रदेश)
  • मृत्यू - ६ डिसेंबर १९५६(दिल्ली)

आज आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची माहीती पाहणार आहोत. महान दलित नेते, गाढे पंडित व भारतीय राज्यघटनेचे एक शिल्पकार डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म महस येथे झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबवडे हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे सुरुवातीचे प्राथमिक शिक्षण दापोलीच्या शाळेत झाले. 

वडील रामजी सकपाळ हे लष्करातील नोकरीमधून निवृत्त झाल्यावर त्यांना साताऱ्यास नोकरी मिळाल्याने ते तिकडे राहायला गेले,व छोट्या भीमाचे नाव त्यांनी तिथल्या सरकारी शाळेत घातले. भीमाची आई तो सहा वर्षांचा असतानाच वारल्याने, त्याचे लालनपालन वडिलांनी व आत्या मीराबाई यांनी केले.

 बडोदे सरकारची शिष्यवृत्ती मिळवून एल्फिन्स्टन कॉलेजात गेला. तिथून पदवी संपादन केल्यावर बडोदे सरकारच्या मदतीनेच भीमराव तथा बाबासाहेब अमेरिकेस गेले) अर्थशास्त्रात एम्. ए. व पीएच. डी. पदव्या प्राप्त करून ते परत भारतात आले व बडोदे सरकारने दिलेल्या नोकरीवर रुजू झाले. पण अस्पृश्य म्हणून तिथेही काही लोक त्यांचा अपमान करू लागल्याने ती नोकरी सोडून ते मुंबईस सिइन्हॅम कॉलेजात प्राध्यापकाची नोकरी करू लागले. 

नोकरी करीत असतानाच आपल्या अस्पृश्य समजण्यात येणाऱ्या बांधवांना त्या त्रासातून मुक्त करण्यासाठी त्यांच्यात जागृती निर्माण करण्याच्या हेतूने त्यांनी 'मूकनायक ' हे मराठी पाक्षिक सुरू केले.
पुढे कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांची मदत घेऊन ते इंग्लंडला गेले आणि अर्थशास्त्रातली डी. एस. सी. ही सर्वोच्च पदवी, त्याचप्रमाणे बॅरिस्टर ही पदवी संपादन करून ते मुंबईच्या सरकारी महाविद्यालयात आधी प्राध्यापकाची व मग प्राचार्य म्हणून नोकरी करू लागले.

 महाडचे चवदार तळे व नाशिकचे काळाराम मंदिर अस्पृश्यांना खुले करण्यासाठी त्यांनी सत्याग्रह केले. गोलमेज परिषदेला लंडनला जाऊन त्यांनी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली. पण अस्पृश्य समाज हिंदु समाजातून अलग पडू नये म्हणून गांधीजींनी पुण्यास आमरण उपोषण सुरू केले तेव्हा त्यांनी त्यांच्याशी तडजोड केली. 
१९४२ साली ब्रिटिश गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळात मजूरमंत्री असताना त्यांनी अस्पृश्यांसाठी मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालय तर औरंगाबादेस मिलिंद महाविद्यालय काढले. १९४६ साली त्यांना घटना समितीत घेण्यात आले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात कायदामंत्रिपद देण्यात आले. पुढे प. नेहरूंशी मतभेद होऊन त्यांनी ते पद सोडले. 

१९५६ मध्ये आपल्या एक लाख अनुयायांसह त्यांनी नागपूरला बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. त्यांनी 'शूद्र कोण होते ? ' 'पाकिस्तानवर विचार ', अशांसारखे अनेक इंग्रजी ग्रंथ लिहिले. वयाच्या पासष्टाव्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. मरणोत्तर त्यांना 'भारतरत्न' हा किताब भारत सरकारने बहाल केला,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत