Shahu Maharaj Information In Marathi
- जन्म दिवस - २६ जुन १८७४
- जन्म ठिकाण - कागल
- मृत्यू - ६ मे १९२२ (मुंबई)
आज आपण शाहु महाराज यांची माहीती पाहणार आहोत. बालपण व शिक्षण शाहू महाराजांचा जन्म २६ जुन १८७४ रोजी कागलच्या घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मुळ नाव यशवंतराव होते. त्यांच्या पित्याचे नाव जयसिंगराव उर्फ आबासाहेब घाटगे, तर मातेचे नाव राधाबाईसाहेब होते. १७०८ साली ताराबाईने कोल्हापुर राज्याची स्थापना केली. या राज्याचा वारसदार चौथा शिवाजी यास इंग्रजांनी वेडसर ठरवून अहमदनगरच्या किल्ल्यात ठेवले. तेथेच त्यांचा १८८३ मध्ये अंत झाला. छत्रपतीच्या पत्नी आनंदीबाईसाहेब यांनी आबासाहेब घाटगेंच्या ज्येष्ठ पुत्रास १७ मार्च १८८४ रोजी दत्तक घेतले. त्यांनाच पुढे शाहू महाराज म्हणून ओळखले
जावू लागले. - शाहू महाराजांचे सुरूवातीचे शिक्षक श्री कृष्णाजी भिकाजी गोखले, हरिपंत गोखले व फिट् ।
झिराल हे होते. - शाहू महाराजांनी १८८५ ते ८९ मध्ये राजकोटच्या राजपुत्रांसाठीच्या महाविद्यालयात शिक्षण घेतले. या काळात प्रिन्सिपॉल मॅकॉल यांचे
त्यांना मार्गदर्शन लाभले. येथे दत्तोबा शिंदे व पांडू भोसले यांनी त्यांना मल्ल विद्येचे शिक्षण दिले. . १८९० ते ९४ या काळात महाराजांनी सर एस.एम. फ्रे जर यांच्या मार्गदर्शनाखाली धारवाड येथे इंग्रजी भाषा राज्यकारभार, जगाचा
इतिहास इ. चे शिक्षण घेतले. फ्रेजर या त्यांच्या गुरू कडूनच त्यांना पुरोगामी विचारांची व कर्तव्य निष्ठतेची प्रेरणा मिळाली. - शाहू महाराजांचा विवाह १ एप्रिल १८९१ रोजी बडोदा येथील गुणाजी खानविलकर यांची कन्या लक्ष्मीबाई बरोबर झाला. . त्यांना राधाबाई व आउबाई अशा दोन मुली व छत्रपती राजाराम आणि राजकुमार शिवाजी अशी दोन मुले होती. शिवाजी महाराजांचा मल्ल
रानडूकराचा पाठलाग करतांना झाला. कार्यास सुरूवात - .. .२ एप्रिल १८९४ रोजी महाराजांचा राज्याभिषेक होउन त्यांनी राज्याची सुत्रे स्विकारली. त्यांनी पुर्वजांप्रमाणे इंग्रजांशी संघर्ष न करता, इगंजांना सहकार्य करून आपल्या अधिकारांचा उपयोग जनकल्याणासाठी करण्याचे ठरविले.
त्यांना स्वराज्यापुर्वी सुराज्य निर्माण करायचे होते.
शाहू महाराजांच्या हस्ते ८ मे १८८८ राज
शाहू महाराजांच्या हस्ते ८ मे १८८८ रोजी कोल्ह पर -मिरज रेल्वे मार्गाची पायाभरणी झाला. १) शैक्षणिक कार्य - . शाहू महाराजांच्या एकूण कार्यात त्यांचे शैक्षणिक काय
एकूण कार्यात त्यांचे शैक्षणिक कार्य अतिशय महत्वाचे आहे. त्यांनी प्राथमिक शिक्षणाला महत्व दिने प्रत्यक गावात एकतरी शाळा असावी व ती गावातील व्यक्तींनी चालवावी असे ठरविले. त्यासाठी वतनदारा पध्दत उपयुः पान त्यानी १९१३ मध्ये शिक्षकांची पगारावर ने णक सरू केली. खेडयांमध्ये मंदीर चावडी, धर्मशाला इ. इमारतीत शाळा सुरू केल्य २५ जुलै १९१७ च्या आदेशानुसार महाराजांनी प्राथमिक शाळेत फी माफीची घोषणा केली. . २१ नोव्हें १९१७ च्या जाहिरनाम्यानुसार संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्यात आले. गुणवत्ता धारक शिक्षक निवडण्यासाठी जुन १९१८ पासून शिक्षकांसाठी परीक्षा सुरू ला.
खर्च चालविण्यास
लावण्यासाठी १९१८ मध्ये शिक्षण विषयक कराचा कायदा केला. दरमहा १०० पेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांवर हा कर लावला.
आपल्या महसुलापैकी ६% शिक्षणावर खर्च करण्याचे ठरविले. - १९१९ पासून अस्पृश्यांच्या स्वतंत्र शाळा बंद करून त्यांना इतर शाळेत दाखल केले. - शाहू महाराजांनी राजाराम महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या स्त्रीयांना फी माफीची सवलत दिली. - त्यांनी संस्थानाच्या शिक्षणाधिकारी म्हणून मिस लिट्लनंतर श्रीमंत रखमाबाई केळकर यांची नेमणूक केली. २) उच्च व व्यवसाय शिक्षण -
काल्हापुर येथे सुरू झालेल्या इंग्रजी शाळेचे १८८१ मध्ये राजाराम महाविद्यालयात रूपांतर झाले. त्याची वर्षासने कंट
महाराजानी दरबारातर्फे दरवर्षी ५०,०००/- रू देण्यास सुरूवात केली. पुढे हे महाविद्यालय आर्यसमाजाकडे सोपविले. - १९०३ ला टेक्निकल स्कूलची स्थापना केली. - गावाचा कारभार व्यवस्थित चालविण्यासाठी १९१९ ला पाटील स्कूल व तलाठी स्कूल सुरू केले. - तांत्रिक शिक्षणासाठी जयसिंगराव घाटगे टेक्निकल इन्स्टिट्यूटची स्थापना केली. यात विद्यार्थ्यांना लोहारकाम गवंडीकाम, सुतारकाम
इ. शिक्षण दिले जाई. • विद्यार्थ्यांमध्ये लष्करी जीवनाची आवड निर्माण व्हावी म्हणून इन्फंट्री स्कूल सुरू केले. भारतीय वसतिगृहाचे आय जनक - - सर्व जातीजमातीच्या विद्याथ्यांसाठी १८९६ मध्ये राजाराम वसतिगृह सुरू केले. यात फक्त ब्राम्हण विद्यार्थ्यांनाच समाविष्ट केले गेले.
त्यामुळे शाहू महाराजांनी निरनिराळया जातीसाठी वसतिगृहे सुरू केले. - १९०१ मध्ये निक्टोरिया पराठा बोर्डिंगची स्थापना केली. (PSI पूर्व परीक्षा 2003) - १८ एप्रिल १९०१ रोजी जैन वसतिगृहाची स्थापना केली. - १९०६ मध्ये वीरशैव लिंगायत विद्यार्थी वसतिगृह स्थापन केले तसेच मुस्लिम बोर्डिंग स्थापन केले. - अस्पृश्यांसाठी १९०८ मध्ये मिस क्लर्क होस्टेल ची स्थापन केली. - १९११ मध्ये शिंप्यांसाठी नामदेव वसतिगृहाची स्थापना केली. - १९२० मध्ये गरीब मुलांना शिक्षण घेता यावे म्हणून श्री.प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिग हाउसची स्थापना केली. - १९२१ मध्ये नाभिकांसाठी शिवकंठी शेष समाज बोर्डिगची स्थापना केली. - शाहू महाराजांनी पुणे, अहमदनगर, नागपुर येथेही वसतिगृहांची स्थापना केली.
महाराजांनी आपल्या कारकिर्दीत २० पेक्षा जास्त वसतिगृहे कोल्हापुरमध्ये स्थापन केली. म्हणून कोल्हापुरला वसतिगृहाची जननी असे शाहू महाराजांनीच गौरविले.
महाराज पण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे पदसिध्द अध्यक्ष होते. वेदोक्त प्रकरणानंतर त्यांनी राजीनामा दिला. . शाह महाराजांनी पं. म. मो.मालवीय यांच्या विनंतीनुसार बनारस हिंदु विश्व विद्यालयास आर्थिक सहकार्य केले - १५ नोव्हे १९०६ मध्ये त्यांनी किंग एडवर्ड मोहमेडन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.
द्वाराजांच्या शैक्षणिक धोरणामुळे, कर्मवीर भाउराव पाटील, श्री भाउसाहेब हिरे, पंजाबराव देशमुख, श्री. बापुजी साळुखे इ. कड़न प्रेरणा घेउन शिक्षणाची गंगोत्री वाहती ठेवली.
समाज सुधारणा - ..पदाची सुत्रे हाती घेताच अब्राम्हणांना नोकऱ्या देणे सुरू केले.
वेदोक्त प्रकरण? - नोव्हे १८९९ मध्ये महाराज पंचगंगा नदीकाठी स्नानासाठी गेले असता परोहित नारायण भटजी वेदोक्त मंत्रा ऐवजी पुराणोक्त मंत्र म्हणत होते. याचा खुलासा केलो असता भटजींनी महाराज क्षत्रिय नसल्याचे सांगितले. यातून ब्राम्हण -ब्राम्हणेतर संघर्षाचे वेदोक्त प्रकरण सुरू
झाले. - अप्पासाहेब राजोपाध्यांचे वतन काढले - १९०१ साली . १९०१ मध्ये महाराजांनी नारायण भट्ट सेवेकरी यांचेकडून वेदोक्त पध्दतीने श्रवणी केली. ...वेदोक्त प्रकरणात टिळकांनी व श्रृंगेरीच्या जगद्गुरू शंकराचार्यांनी ब्राम्हणांची बाज घेतली तर १६ एप्रिल १९०२ रोजी वेदोक्त समितीने शाहू
महाराजांची बाजू घेतली. . महाराजांना वेदोक्ताचा पुर्ण अधिकार असल्याचे करवीरच्या शंकराचार्यांनी जाहिर केले. - १९०५ मध्ये महाराजांनी राजोपाध्यांची इनामे जप्त केली. - महाराजांनी क्षात्रजगत्गुरूचे नवे पिठ निर्माण करून त्यावर मराठा जातीच्या सदाशिव बेनाडीकर यांची नेमणूक केला.
निरनिराळ्या जातीचे पुरोहित निर्माण करण्यासाठी पुरोहितांची शाळा काढली. 'आरक्षणाचे आद्य जनक -२६ जुलै १९०२ रोजी मागासलेल्या वर्गाकरीता सरकारी नोकरीत ५० % जागा राखीव ठेवण्याचा जाहिरनामा काढला. ब्राम्हणेतर चळवळ - म. फुलेंनी सुरू केलेल्या ब्राम्हणेतर चळवळीचे नेतृत्व शाहू महाराजांनी स्विकारले. बहुजन समाजात शिक्षण प्रसार करणे, त्यांना धार्मिक बंधनातून मुक्त करणे व राजकीय हक्क मिळवून देणे हे त्यांनी आपले कार्य मानले. यासाठी त्यांनी १९१६ ला निपानी येथे डेक्कन रयत संस्थेची स्थापना केली. ब्राम्हणेतर चळवळीस १९१७ नंतर द. भारतात लोकप्रियता मिळाली. महाराज १९१८ च्या मुंबईच्या पिपल्स युनियनचे तसेच जुलै १९२० च्या हुगळी सामाजिक परिषदेचे अध्यक्ष होते. महाराजांवर सत्यशोधक समाजाचा प्रथाव होता. म्हणून ११ जाने १९११ मध्ये कोल्हापुर येथे शाहू सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष भास्करराव जाधव हे होते. त्यांनी घरचा पुरोहित हे पुस्तक लिहिले. या समाजातर्फे पुरोहित शाळा चालविल्या जात. १९१२ मध्ये ब्राम्हणेतरांची पहिली श्रवणी वेदोक्त पध्दतीने मराठी पुरोहिताने केली. १९१३ मध्ये कोल्हापुरात सत्यशोधक समाजांची शाळा सुरू झाली. या शाळेचे प्रमुख विठ्ठलराव डोणे हे होते. महाराजांनी उत्तर भारतातील आर्य समाजाच्या गुरूकुलाची पहाणी केली. व १९१८ मध्ये कोल्हापुरात आर्यसमाजाची शाखा स्थापन केली. १९१८ मध्ये राजाराम कॉलेज, हायस्कूल व प्रशिक्षण शाळेची जबाबदारी आर्य समाजाकडे सोपविण्यात आली. १९२० नंतर ब्राम्हण -ब्राम्हणेतर वाद पुढे चालू नये असे महाराजांना वाटू लागले. अस्पृश्योध्दाराचे कार्य - शाहू महाराजांनी अस्पृश्यांसाठी मिस क्लर्क वसतिगृह सुरू केले. तसेच मराठा विद्यार्थ्यांसाठीच्या व्हिक्टोरिया वसतिगृहातही अस्पृश्य व मुस्लिमांना प्रवेश दिला. - १९०६ ला रात्रशाळा सुरू केल्या. मुलीसाठी १९०७ मध्ये रात्रशाळा सुरू केली. - १९११ च्या हुकूमानुसार अस्पृश्यांना मोफत शिक्षण सुरू केले. ..१९१९ मध्ये अस्पृश्यता बंदी कायदा करून अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा बंद केल्या. - अस्पृश्यांना बरोबरीचे हक्क व मान देण्यासाठी राधाबाईच्या विवाहात अस्पृश्यास कोचमन म्हणून बसविले.
जून १९१८ मध्ये महारवतने बंद केली. ९ ऑगस्ट १९१८ रोजी अस्पृश्यांना लाचारीने वागविणारी बलुतेदारी व बेठबिगारीची प्रथा बंद केली. त्याचा भंग करणाऱ्यास १०० रू दंड ठेवला. त्यानी अस्पृश्यांना व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले. गंगाधर कांबळे यास शहराच्या मध्यवस्तीत चहाचे दुकान उघडून दिले. महाराज - स्वत: तेथे जाउन चहा पित.
अस्पृश्यांना प्रतिष्ठा मिळावी म्हणून महार पैलवानांना जाठ पहि १९१८ च्या हुकुमानुसार गुन्हेगार जमातीच्या लोकांना पोलिस
" महार पलवानांना जाठ पहिलवान. चांभारांना सरदार व भंग्यांना पंडीत अशा पदव्या दिल्या. कुमानुसार गुन्हेगार जमातीच्या लोकांना पोलिस चौकीवरची हजेरी बंद केली. हापुर नगरपालिकेच्या चेअरमनपदी दत्तोबा पवार या अस्पृश्यांची नेमणूक केली.
। हातकरू विद्यार्थ्यांना तसेच आंबेडकरांना इंग्लंड येथील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली. २० मार्च १९२० मध्ये कोल्हापुर संस्थानातील माणगाव येथे भरलेल्या अस्पृश्यता परिषदेस हजर होते. त्यात त्यान चळवळीचे नेतृत्व करण्यास प्रोत्साहन दिले. नागपुर, दिल्ली येथे भरलेल्या अस्पृश्यांच्या चळवळीचे अध्यक्षपद भूषविले. शाहू महाराजांनी सहभोजने, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन दिले. स्त्रीयांसाठी कार्य
स्त्रीयांसाठी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. - १११७ मध्ये विधवा पुनर्विवाहाचा कायदा व विवाह नोंदणीचा कायदा यांची अंमलबजावणी सुरू केली. - १२ जुलै १९१९ रोजी आंतरजातीय विवाह कायदा केला. आपल्या मुलीचा धनगर राजपुत्राशी विवाह करून उक्ती व कृतीतील एकवाक्यता
दाखवून दिली. । २ ऑगस्ट १९१९ रोजी स्त्रीयांवरील अत्याचाराचा प्रतिबंध करणारा तसेच घटस्फोटास मान्यता देणारा कायदा पास केला. - १७ जाने १९२० रोजी अनौरस संतती व जोगतीणी -देवदासी निर्मुलन विषयक कायदा केला. - १९२० मध्ये महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूलची स्थापना केली.
आर्थिक सुधारणा :१) शेती - - १८९७ च्या दुष्काळात शेतकऱ्यांना कर्जे, शेतसाऱ्यात सुट दिली. जनावरांसाठी चाऱ्याची सोय केली. . शेतीस निश्चित पाणीपुरवठा व्हावा यासाठी १९०७ मध्ये कोल्हापुर पश्चिमेस ५५ किमी अंतरावर दाजीपुर नजीक भोगावती नदीवर
महाराणी लक्ष्मीबाई तलाव नावाचे धरण बांधले. त्याच वर्षी आक्कासाहेबांचा विवाह देवासच्या महाराजांसोबत झाला. म्हणून धरणाशेजारीच . राधानगरी हे गाव वसविले. शेतीत तुती, चहा व कॉफ़ीची यशस्वी लागवड केली.
अधिकारांचा दुरूपयोग करणाऱ्या कुलकर्त्यांची वतने २८ फेबु १९१८ मध्ये रद्द केली व पगारदार तलाठी नेमले. - १९१८ मध्ये भटके जीवन जगणाऱ्या फासे पारध्यांना शेतीचे वाटप केले. - १९०२ ला पाटबंधारे विषय धोरण जाहिर केले.
कळंबा, वडगाणे, दापूर, शहापुर व रंकाळा इ तलाव बांधले. - १९१२-१३ मध्ये किंग एडवर्ड अॅग्रिकल्चरल इन्स्टिटयूची स्थापना केली. - जून १९१८ मध्ये वेठबिगारी समाप्त करण्याचा व जमिनी रयतावा करण्याचा जाहिर नामा काढला. २) व्यापार . १८९५ मध्ये गुळाच्या व्यापारासाठी प्रसिध्द असलेली शाहपुरी बाजारपेठरेल्वे स्टेशनजवळ वसविली. यात त्यांच्यादोन्ही पुत्रांना स्वतंत्र
- व्यवसाय काढून दिले. . १९०६ मध्ये महाराजांनी छत्रपती शाहू स्पिनिंग अॅन्ड विव्हिंग मिलचा पाया घातला. - १९०७ मध्ये सहकारी तत्वावर एका कापड गिरणीची तबाखूच्या व्यापारास उत्तेजन देण्यासाठी जयसिंगपुर वसाहत स्थापन केली.
इतर कार्य - बलोपासनेसाठी जुना राजवाडयात आखाडा बांधला. कुस्त्यांसाठी खासबाग मैदान तयार केले. किर्लोस्कर नाटक कंपनीची कोल्हापुर मधील जबाबदारी बालगंधर्वाकडे दिली. गानसम्राट अल्लादिया खाँ यांना मानधन, गणपतराव जोशी व केशवराव भोसले नाटककार व नटांना आश्रय दिला चित्रकार दत्तोबा दळवी व आनंदराव पेंटर यांनी महाराजांच्या आश्रयामुळेच राज्यात चित्रकलेचा विकास केला
अप्पाजी धोंडीराज मुरतुले हे त्यांच्या दरबारातील प्रतिभावंत कवी होते. - २० व्या शतकाच्या प्रारंभी देशातील पहिले रेसकोर्स कोल्हापुरला स्थापन झाले.
महारोग्यांसाठी व्हिक्टोरिया लेप्रसी असायलमची जुन १८९७ मध्ये स्थापना केली.
जातवार प्रतिनिधीत्वांसाठी महाराजांनी डिसें १९१७ मध्ये लॉर्ड माँटेग्यू यांची भेट घेतली होती. , शाहू महाराजांनी १९१९ च्या मॉटेग्यू -चेम्सफर्ड कायदयाचे स्वागत केले. - शाहू महाराजांनी १९१२ मध्ये सहकारी कायदा केला.
शाहू महाराजांनी भूषविलेली पदे - १० नोव्हे १९१८ रोजी झालेल्या परळ (मुंबई ) येथे झालेल्या कामगारांच्या सभेचे अध्यक्ष स्थान भूषविले. लॉर्ड विलिंग्टनच्या कामगारांनी
पाश्चातांप्रमाणे संघ स्थापन करावे असा सल्ला दिला. , १९१८ मध्ये नवसारी (गुजरात) येथील आर्य समाजाच्या ११ व्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. - १९१९ मध्ये कानपुर येथील कुर्मी क्षत्रिय समाजाच्या १३ व्या परिषदेचे अध्यक्ष होते. - भावनगर (गुजराज)येथे झालेल्या १९२० च्या आर्य समाज परिषदेचे अध्यक्षस्थान भूषविले. - नागपुर (१९२०) व दिल्ली येथील अखिल भारतीय बहिष्कृत परिषदेचे अध्यक्षपद भूषविले. - नोव्हे १९२० च्या हुबळी येथे कर्नाटक ब्राम्हणेतर परिषदेचे अध्यक्ष - १५ एप्रिल १९२० रोजी नाशिक येथे उदाजीराव मराठा विद्यार्थी वसतिगृहाच्या इमारतीची कोनशिला बसविली.
शाहू महाराजांना मिळालेले बहूमान - . १८९५ मध्ये ब्रिटनच्या सम्राज्ञीने GCSI हा किताब दिला. * पुण्याच्या सार्वजनिक सभेद्वारे मानपत्र अर्पण (राज्यभिषेक) केले गेले. "२४मे१९०० रोजी व्हिक्टोरियाराणीच्या वाढदिवसानिमित्त ब्रिटिश सरकारने त्यांच्या प्रजाहिताची कर्तव्य निष्ठा पाहन महाराजा ही पदवी दिली.
१४ में १९०२ ला सातव्या एडवर्डच्या राज्यरोहनास हजर होते त्या वेळी त्यांना केंब्रिज विद्यापीठाने एल.एल.डी. पदवी दिली.
१७ मे १९०८ च्या परदेश दौऱ्यात सत्कार, पदव्या व मानपत्रे मिळाली. - कानपुर येथे १९ एप्रिल १९१९ रोजी झालेल्या कुर्मी क्षत्रिय समाजाच्या परिषदेचे अध्यक्षपद भूषविले यातच २१ एप्रिल रोजी त्यांना राजर्षी
ही बहुमानाची पदवी देण्यात आली. महाराजांना १६ एप्रिल १९२० रोजी नाशिकच्या जनतेकडून मानपत्रे अर्पण करण्यात आली.
शेतकऱ्यांचा खरा राजा अशा शब्दात शाहू महाराजांचा गौरव करतात. - महर्षी वि. रा. शिंदेंनी महाराजांचा गौरव सींगपुर्ण राष्ट्र पुरूष असा केला. - भाई माधव बागल म्हणतात 'He was king, But democratic king'
यशवंतराव मोहिले यांनी महाराष्ट्राचे गौतमबुध्द या शब्दात महाराजांचा गौरव केला. - त्यांच्या लोकाभिमुख कार्यामुळे त्यांचा उल्लेख रयतेचा राजा असा केला जातो. - ब्राम्हण त्यांना क्षुद्र राजा म्हणून हिनवित तर, त्यांच्या राजकीय स्वातंत्राच्या विरोधामुळे त्यांना स्वराज्याचे शत्रु म्हणून विरोधक हिनवत.
त्यांना २० व्या शतकातील आदर्श राजा म्हणून ओळखतात. - शाहू महाराजांचे नाव दिलेले विद्यापीठ - कानपुर • डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात - 'He was a pioneer of Social Democracy' • जस्टीस या वृत्तपत्रात त्यांच्या मृत्यूनंतर 'शाहू हे माणसांत राजे होते व राजांत माणूस होते' असे लिहिले.
महाराजांचे विचार - • आधी सामाजिक सुधारणा की राजकीय सुधारणा हा वाद इष्ट नाही. ही राष्ट्रोन्नतीच्या गाडयाची दोन चाके आहेत. एकच चाक लावून गाडा
पुढे नेणे शक्य होईल का? - सत्ता केवळ उच्च वर्णियांकडे जाउ नये म्हणून निदान १० वर्षे तरी जातवार प्रतिनिधीत्वाची मागणी केली.
जपानमधील सामुराई जातीप्रमाणे ब्राम्हणांनी देशोन्नतीसाठी आपला जन्माने प्राप्त दर्जा सोडावा. ६ मे १९२२ रोजी शाहू महाराजाचे वयाच्या ४८ व्या वर्षी २८ वर्षाच्या कारकिर्दीनंतर मुंबई येथील खेतवाडीतील पन्हाळा लॉज बंगल्यात
अचानक निधन झाले. शाहू महाराजांचा २६ जुन हा जन्मदिन महाराष्ट्रात सामाजिक न्याय दिन म्हणून पाळला जातो. - कोल्हापुर रेल्वेस्टेशनला छत्रपती शाहू टर्मिनस असे नाव देण्यात आले आहे.
संसदेच्या प्रांगणात शाहू महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे दि. १७ फेब्रु. २००९ रोजी अनावरण झाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत