Bhagat singh information in marathi
सरदार भगतसिंह यांचा जन्म २७ सप्टेंबर १९०७ ला त्यावेळच्या पंजाब प्रांतातील ल्यालपूर जिल्ह्यातील बंगा या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सरदार किशनसिंह व आईचे विद्यावतीदेवी होते. भगतसिंहचे वडीलही क्रांतीकारी होते. भगतसिंहच्या जन्माच्या वेळी ते तुरूंगात होते. पण नंतर २-३ दिवसातच त्यांची सुटका झाली. ब्रिटिश सरकारविरोधी कारवायात ते तुरूंगात डांबल्या गेले होते.
जीवनक्रम
- जन्म-२७ सप्टेंबर १९०७
- प्राथमिक शिक्षण १९१४ पर्यंत (बंगा गावाला)
- चळवळीत सहभाग - इ.स. १९१९
- बी.ए. वर्गात प्रवेश - इ.स. १९२२
- क्रांती चळवळीत उडी - इ.स. १९२३
- चंद्रशेखर आझादशी भेट - इ.स. १९२४
- दशहरा बाँब केसमध्ये अटक - इ.स. १९२५
- इन्कलाब जिंदाबाद - डिसेंबर १९२८
- असेंब्लीत बाँब फेकले - ८ एप्रिल १९२९
- आजन्म कारावासाची शिक्षा - १२ जून १९२९
- साँडर्स खून खटल्यात फाशीच्या शिक्षेची सुनावणी - ७ ऑक्टोबर १९३०
- चंद्रशेखर आझादचे निधन - २७ फेब्रुवारी १९३०
- कुटुंबियांची भेट- ३ मार्च १९३१
- वकील प्राणनाथ मेहतांची दयेचा अर्ज करायची गळ- १९ मार्च १९३१
- लाहोर तुरुंगात फाशी - २३ मार्च १९३१
या कुटुंबात स्वातंत्र्य संग्रामाचा कंकण किशनसिंह यांचे वडील अर्जुनसिंह यांनी बांधलं. इ. स. १८९३ पर्यंत अर्जुनसिंह समाजसेवा करण्यात मग्न होते. समाजसेवा करतांनाच लाहोरला भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात त्यांची दादाभाई नौरोजींशी ओळख झाली. जालंधरचे प्रतिनीधी म्हणून या अधिवेशनाला अर्जुनसिहं हजर झाले होते. तेथूनच त्यांचा स्वातंत्र्य चळवळीच्या मार्गाने प्रवास सुरू झाला.
किशनसिंह व भगतसिंहचे काका अजितसिंह यांनीसुद्धा स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला होता. घरातील सर्व पुरुष मंडळी स्वातंत्र्यसंग्रामात असल्यामुळे घरातील स्त्रियांना सतत काळजी असायची. अजितसिंहना हद्दपारीची शिक्षा झाली. किशनसिंह यांनाही तुरूंगवास घडला. यामुळे वंशपरंपरेने ब्रिटिश सरकारशी त्यांचे शत्रुत्वच होते. यामुळे घरात नेहमी संकट व दुःखच असायचे.
पण तरीही देशभक्तीचे बाळकडू प्यालेले हे घर मागे हटले नाही. स्त्रियांनीही त्यांना पूर्ण पाठिंबा दिला. भगतसिंहाच्या जन्माबरोबरच यांचीही तुरूंगातून सुटका झाल्यामुळे जणू ईश्वराने यांना सगळीच सुखे पुढ्यात मांडली असे म्हणावे लागेल.
bhagat-singh-information-in-marathi |
भगतसिंह यांंचे बालपण
घरातील सर्व पुरूष मंडळींचा स्वातंत्र्य चळवळीत सहभाग त्यामुळे सरकारच्या अत्याचारामुळे त्यांच्या घरातील स्त्रियांना नेहमी काळजीच असायची. अशात तेरा वर्षानंतर भगतसिंहचा जन्म झाला त्यामुळे कुटुंबाच्या आनंदाला पारावार नव्हता.
त्यांच्या तेजस्वी चेहऱ्यामुळे लहानणीच सर्वजण हे जाणून होते की, हा मुलगाही कुळाचे नाव उज्ज्वल करील.'
इ.स. १९१५ मध्ये अचानक छोट्याशा आजारात त्यांचे वडील बंधु जगतसिंह यांचे निधन झाले. भगतसिंहावर व त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. पाच वर्षापूर्वी काकाचे निधन व आता मोठ्या भावाचे निधन. त्यांना कमी वयातच दोन दुःख पचवावे लागले. पण काळ कोणासाठी थांबत नाही या उक्तीप्रमाणे भगतसिंहाचाही जीवनक्रम चालू राहिला.
काळाच्या ओघातच त्यांना त्यांचे दुःख हळुहळु विसरता आल. लाहोरला शिकायला आल्यावरही ते चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊ लागले. पण इंग्रजांचा तिटकारा असल्यामुळे ते इंग्रजीचा फारच थोडा अभ्यास करित व या विषयात फक्त पास होण्यापरतेच गुण घेत होते.
भगतसिंहचे वडील व दोन्ही काका नेहमी ब्रिटिश सरकारच्याविरोधी चळवळीसाठी कधी तुरूंगात असायचे तर कधी गुप्त राहुन आपले कार्य करायचे. यातच त्यांचे एक काका स्वर्णसिंह यांचा तुरूंगातच मृत्यू झाला.
हे सर्व प्रकार भगतसिंह लहानपणापासुन बघतच होते व तेथूनच त्यांच्या मनातही ब्रिटिश सरकारविरोधी घृणा निर्माण झाली होती. भगतसिंह अगदी तीन वर्षाचे असतांनापासूनच त्यांच्या मनातील तिरस्कार दिसून आला. एकदा ते आपल्या वडिलांसोबत शेतात गेले असता तेथे ते एक रोपटे रोवत होते. वडिलांनी विचारले, 'काय करतो आहेस?' त्यावर ते उत्तरले, 'मी सर्व शेतांमध्ये बंदुकांच झाड लावतो आहे.
एवढ्या लहान वयापासून त्यांना बंदुकीचा ध्यास लागला. अर्थात देशातील स्थिती यावेळी अशीच होती. भगतसिंहाचे वडील, आजोबा व काका सर्वच शिक्षित होते. त्यामुळे भगतसिंहानेही उच्च शिक्षण घ्यावे असे सर्वांना वाटू लागले
हे सर्व प्रकार भगतसिंह लहानपणापासुन बघतच होते व तेथूनच त्यांच्या मनातही ब्रिटिश सरकारविरोधी घृणा निर्माण झाली होती. भगतसिंह अगदी तीन वर्षाचे असतांनापासूनच त्यांच्या मनातील तिरस्कार दिसून आला. एकदा ते आपल्या वडिलांसोबत शेतात गेले असता तेथे ते एक रोपटे रोवत होते. वडिलांनी विचारले, 'काय करतो आहेस?' त्यावर ते उत्तरले, 'मी सर्व शेतांमध्ये बंदुकांच झाड लावतो आहे.
एवढ्या लहान वयापासून त्यांना बंदुकीचा ध्यास लागला. अर्थात देशातील स्थिती यावेळी अशीच होती. भगतसिंहाचे वडील, आजोबा व काका सर्वच शिक्षित होते. त्यामुळे भगतसिंहानेही उच्च शिक्षण घ्यावे असे सर्वांना वाटू लागले
प्राथमिक शिक्षण
आई व काकुच्या लाडातच भगतसिंहांचे बालपण गेले. बंगा येथेच भगतसिंहाचे प्राथमिक शिक्षण झाले. लहानपणापासूनच ते अभ्यासात हुशार होते. घरातच शिक्षणाचं बाळकडू मिळाल होतं. त्याच्या जोडीला बुद्धिमत्ताही होती. त्यामुळे वर्गात नेहमी भगतसिंह अग्रेसर असायचे. त्यांच्यामध्येही नेतृत्वाचीही लयबद्धता होती. वर्गात जेव्हा ते बोलायचे तेव्हा एखादया नेत्याप्रमाणे भासायचे. चौथ्या वर्गापासून त्यांचे बोल असायचे की, 'मी मोठा झाल्यावर इंग्रजांना पळवून लावणार आहे.'
इ.स. १९१४ मध्ये प्राथमिक शिक्षण बंगा येथे आटोपून पुढील शिक्षणाकरिता वडिलांनी लाहोरला दयानंद अँग्लो वैदिक स्कूलमध्ये टाकले. इंग्रजी शाळेमध्ये शिक्षण देणे किशनसिंहांना पटत नव्हते. त्यांचे शिक्षणही अशाच जालंदरच्या साईनाथ अँग्लो संस्कृत विद्यालयात झाले होते. त्या काळात त्यांचे लाहोरला येणे-जाणे होते. मुलावर लक्ष ठेवता येईल या दृष्टीने त्यांनी भगतसिंहाला या विद्यालयात टाकले होते.
दयानंद स्कूलमध्ये
लाहोरला दयानंद अँग्लो वैदीक स्कूलमध्येही भगतसिंहानी आपल्या बुद्धिची चमक दाखविली. शहरातील शाळेत आपल्या मुलाला कमी गुण पडू नये म्हणून किशनसिंहानी त्यांना घरी शिकवण्याकरिता एका शिक्षकाची व्यवस्था केली पण दोन दिवसांच्या शिकवणीतच शिक्षकांना त्यांच्या चाणाक्ष बुद्धिची साक्ष पटली व त्यांनी किशनसिंहाना सांगितले की, 'भगतसिंहांना खाजगी शिकवणीची काहीच गरज नाही. तो फार हुशार आहे.
इ.स. १९१५ मध्ये अचानक छोट्याशा आजारात त्यांचे वडील बंधु जगतसिंह यांचे निधन झाले. भगतसिंहावर व त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. पाच वर्षापूर्वी काकाचे निधन व आता मोठ्या भावाचे निधन. त्यांना कमी वयातच दोन दुःख पचवावे लागले. पण काळ कोणासाठी थांबत नाही या उक्तीप्रमाणे भगतसिंहाचाही जीवनक्रम चालू राहिला.
काळाच्या ओघातच त्यांना त्यांचे दुःख हळुहळु विसरता आल. लाहोरला शिकायला आल्यावरही ते चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊ लागले. पण इंग्रजांचा तिटकारा असल्यामुळे ते इंग्रजीचा फारच थोडा अभ्यास करित व या विषयात फक्त पास होण्यापरतेच गुण घेत होते.
स्वातंत्र्य चळवळीत सहभागी
इ.स. १९१९ मध्ये भगतसिंह नवव्या वर्गात होते. या वयातच त्यांनी आपल्या कुटुंबातील स्वातंत्र्यचळवळीत सहभागी झालेल्या व्यक्तींची संपूर्ण माहिती मिळविली. आनुवंशिकतेनेही वडील, काका यांचा बाणा भगतसिंहाच्या अंगी येत गेला.
वडिलांप्रमाणे नेतृत्व करायची सिद्धता भगतसिंहांनी अंगीकारली होती. एकंदरीत काय की भगतसिंह मोठा झाल्यावर क्रांतिवीरच होणार असं चित्र स्पष्ट दिसू लागल. आणि याचवर्षी त्यांच्या डोक्याचा संताप वाढविणारी घटना घडली. यांच्याच प्रदेशात ब्रिटिशांनी निःशस्त्र लोकांवर बंदुकांच्या फैरी झाडल्या. अमृतसर येथील जालियनवाला बागेत १३ एप्रिलला हे हत्याकांड घडले. अंधाधुंद गोळीबाराने हजारो लोकांचे बळी घेतले.
रौलट कमेटीच्या शिफारशींवरून ब्रिटिश सरकारने 'रौलेट अॅक्ट' हा दडपशाहीचा कायदा यावर्षी पास केला होता. या कायदयाने 'ना तक्रार, ना चौकशी' हा प्रकार चालणार असल्याने गांधीजींनी या कायदयाच्या विरोधात सत्याग्रह आंदोलन उभारले. देशात ठिकठिकाणी हरताळ व सभा सुरू झाल्या. २३ मार्चला सत्याग्रह दिन संपूर्ण देशभर लोकांनी पाळला. पंजाब प्रांतही या सत्याग्रहापासून दूर नव्हता. या चळवळीला सरकारने दडपून टाकण्यासाठी प्रयत्न केले.
चार दिवसांतच अमृतसर लष्कराच्या स्वाधीन झालं. १३ एप्रिलला जालियनवाला बागेत मोठी सभा भरली होती आणि जनरल डायरने हे आमनुष कृत्य केले. या हत्याकांडानंतर देशात कायदेभंग चळवळ सुरू झाली. संपूर्ण देशातून या आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. यावेळी भगतसिंह केवळ बारा वर्षांचे होते. एवढ्या कोवळ्या वयातच भगतसिंह शाळेला रामराम ठोकून या आंदोलनात सहभागी झाले. परदेशी कापडांच्या होळ्या देशात ठिकठिकाणी होत होत्या. या आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
रौलट कमेटीच्या शिफारशींवरून ब्रिटिश सरकारने 'रौलेट अॅक्ट' हा दडपशाहीचा कायदा यावर्षी पास केला होता. या कायदयाने 'ना तक्रार, ना चौकशी' हा प्रकार चालणार असल्याने गांधीजींनी या कायदयाच्या विरोधात सत्याग्रह आंदोलन उभारले. देशात ठिकठिकाणी हरताळ व सभा सुरू झाल्या. २३ मार्चला सत्याग्रह दिन संपूर्ण देशभर लोकांनी पाळला. पंजाब प्रांतही या सत्याग्रहापासून दूर नव्हता. या चळवळीला सरकारने दडपून टाकण्यासाठी प्रयत्न केले.
चार दिवसांतच अमृतसर लष्कराच्या स्वाधीन झालं. १३ एप्रिलला जालियनवाला बागेत मोठी सभा भरली होती आणि जनरल डायरने हे आमनुष कृत्य केले. या हत्याकांडानंतर देशात कायदेभंग चळवळ सुरू झाली. संपूर्ण देशातून या आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. यावेळी भगतसिंह केवळ बारा वर्षांचे होते. एवढ्या कोवळ्या वयातच भगतसिंह शाळेला रामराम ठोकून या आंदोलनात सहभागी झाले. परदेशी कापडांच्या होळ्या देशात ठिकठिकाणी होत होत्या. या आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
१९२२ च्या जानेवारीमध्ये या बहिष्कार आंदोलनाने उग्र रूप घेतले होते पण ४ फेब्रुवारी १९२२ ला संयुक्त प्रांतातील गोरखपूर जिल्ह्यात चौरीचौरा येथे हिंसात्मक प्रकार घडला. पोलिसांच्या उद्दामपणामुळे लोकही खवळले व त्यांनी प्रतिकात्मक भुमिका घेत पोलीसचौकी जाळली. त्यात बावीस पोलीस मेले. गांधीजी हिंसेविरुद्ध असल्यामुळे दुसऱ्या दिवशी हे आंदोलन मागे घेतले. चळवळ थांबल्यामुळे भगतसिंह बेचैन झाले. झंझावाती विचारप्रवाह असल्यामुळे अहिंसेचा आदर वाटण्याऐवजी हिंसात्मक मार्गानेच इंग्रजांना हाकलून लावता येईल असे त्यांना वाटत होते.
बी.ए. ला प्रवेश
इ.स. १९२२ ला असहकार आंदोलन थांबल्यामुळे शाळा-कॉलेज सोडलेल्या विद्यार्थ्यांसमोर पुढे शिक्षण घ्यायला कठीण परिस्थिती झाली. सरकारी शाळेत प्रवेश नाकारला जाऊ लागला. पण लाला लजपतरायनी लाहोरमध्ये नॅशनल कॉलेजची स्थापना करून या समस्येवर तोडगा काढला.
आचार्य जुगलकिशोर यांना कॉलेजचे प्राचार्य म्हणून नियुक्त केले. राष्ट्रभावना ठेवणारे ज्ञानवंत लोकांनाच प्राध्यापकपदी नियुक्ती मिळाली. यामध्ये भाई परमानंद व गुरूकुल कांगडीचे जयचंद विद्यालंकार यांचही समावेश होता. भगतसिंहाला पुढील शिक्षण घ्यायचेच होते.
भाई परमानंदाशी ओळख असल्यामुळे भगतसिंहांना नॅशनल कॉलेजमध्ये सहज प्रवेश मिळाला. वाचनाचा व्यासंग भगतसिंहांना होताच. कॉलेजच्या लायब्ररीत इतर देशाच्या क्रांतिकारकांबद्दलची माहिती होती. ही पुस्तके वाचून त्यांचे सशस्त्र क्रांतीचे विचार मजबूत झाले. मित्रांशीही ते याच विषयावर चर्चा करीत असत. आपले विचार त्यांना सांगत असत.
कॉलेजला असतांना त्यांनी राणाप्रताप, सम्राट चंद्रगुप्त अशा नाटकात भूमिका केल्या. सशस्त्र क्रांतीची मशाल पेटविण्याचीच जणू ही पूर्वतयारी होती. कॉलेजमध्ये त्यांचा सुखदेव व यशपाल यांच्याशी परिचय झाला. विचारसरणी सारखी असल्यामुळे पुढे गाढ मैत्रीही झाली व 'आपली आयुष्ये आपण मातृभूमीला समर्पित करायची !' हा तिघांनी पक्का निश्चय केला.
चंद्रशेखर आझादची भेट
नॅशनल कॉलेजमध्ये असतांनाच तिन्ही मित्र क्रांतीचा विचार पक्का करीत होते. पण इकडे घरात मात्र भगतसिंहांच्या लग्नाविषयी चर्चा चालू होती. कारण त्यावेळी कमी वयातच मुलामुलींची लग्ने व्हायची. लग्न केल्यास आपल्याला आपल्या कर्तव्याची पूर्ती करता येणार नाही या विचाराने त्यांनी वडिलांना लग्न करण्याबद्दल आपला नकार सांगितला.
भगतसिंहांच्या नकाराकडे वडिलांनी दुर्लक्ष केले व लग्नाबद्दलची तयारी चालूच ठेवली. वडील ऐकत नाहीत असे पाहून यांनी घर सोडून जायचा व क्रांतीकारकांमध्ये सामील व्हायचा विचार केला. घरी एका टेबलावर पत्र लिहून ते त्वरीत घर सोडून क्रांतीकारकांमध्ये सामील होण्यासाठी रेल्वेने निघाले.
क्रांति चळवळीत सहभागी होण्याकरिता कोठे जायचे, कुणाला भेटायचे याची माहिती आधीच एकत्रीत केली असल्याने घर सोडल्यावर त्यांची तारांबळ उडाली नाही. ठरल्याप्रमाणे लाहोरहून कानपूरला जायच्या गाडीत प्रवेश केला. कानपूरला पोचल्यानंतर ते सरळ मन्नीलाल अवस्थी यांच्याकडे गेले.
उत्तरप्रदेशमध्ये क्रांतिकारक संघटना तयार करण्याचे काम बंगाली क्रांतीकारकांनी चालविले होते. या संघटनेत येणाऱ्यांना प्रवेश देण्याची जबाबदारी कानपूरला वृत्तपत्र चालविणारे श्री विद्यार्थीजी यांच्याकडे होती. मन्नीलालनी भगतसिंहांची ओळख विद्यार्थीजींशी करून दिली.
भगतसिंहांच्या कुटुंबातील सदस्यांचा पूर्वी चळवळीत सहभाग असल्याने भगतसिंहांना विद्यार्थीजींनी संघटनेत सामील करून घेतले व सर्वप्रथम वृत्तपत्र विक्रीचे काम दिले. नंतर हळूहळू ऑफीसमधले काम दिले. इथे त्यांचा बटुकेश्वर दत्त, अजय घोष, सुरेशचंद्र भट्टाचार्य यांच्याशी परिचय झाला.
इकडे घरी ठेवलेले पत्र वाचून कुटुंबीय काळजीत पडले. कारण चिट्टीत फक्त 'क्रांतीचळवळीत सहभागी होण्यासाठी जात आहे' एवढाच मजकूर लिहिला होता. त्यामुळे त्यांचा ठावठिकाणा माहित नव्हता. पण काही दिवसांतच भगतसिंहांनी आपल्या मित्राला पत्र लिहिले व त्या मित्राने घरच्या लोकांना त्यांचा ठावठिकाणा कळवून चिंतामुक्त केले.
भगतसिंहाच्या जाण्याने त्यांच्या आजीची जयाकौरची प्रकृती फार बिघडली म्हणून किशनसिंहनी घरातील परिस्थितीचे सविस्तर वर्णन करणारे पत्र लिहून त्या मित्राला पत्रासह कानपूरला पाठविले. पत्रात हे सुद्धा लिहिले होते की, तुझ्या लग्नाचा विषय पुन्हा आम्ही घरात काढणार नाही. पण तु लवकर घरी ये.' यामुळे नाईलाजाने त्यांना घरी परत यावे लागले.
घरातील लोकांच्या आग्रहास्तव भगतसिंह घरी आले पण पुढल्याच वर्षी म्हणजे १९२४ ला क्रांतीदिशेने जाण्याची त्यांना पुन्हा संधी मिळाली. पंजाबमध्ये अकाली शीखांचे ब्रिटिशांविरुद्ध आंदोलन सुरू झाले. हे अकाली बंगा गावाहून जैतो येथे जाणार होते. बंगा मुक्कामी यांची व्यवस्था किशनसिंहकडे होती. या कालावधीत त्यांना काही कामानिमित्त मुंबईला जावे लागणार होते म्हणून त्यांनी अकालींच्या व्यवस्थेचा भार भगतसिंहांवर सोपविला.
या अकालींना अन्नपाणी न देण्याचा सरकारचा आदेश होता पण आदेशाला न जुमानता भगतसिंहांनी त्यांची सर्व व्यवस्था केली. सरकारी अधिकाऱ्यांचे लक्ष संपूर्ण स्थितीकडे होतेच. सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे भगतसिंहांवर तुरूंगात टाकण्यासाठी त्यांच्या नावाचे अटक वॉरंट निघाले पण भगतसिंहाना याची पूर्वकल्पना असल्यामुळे ते लाहोरहून ताबडतोब आपला मुक्काम हलवून गुप्तपणे दिल्लीला गेले.
दिल्लीमध्ये 'वीरअर्जुन' या वृत्तपत्र कार्यालयात ते बलवंतसिंह या नावाने भगतसिंह काही दिवस राहिले. इथेच त्यांना कळले की, क्रांतीचळवळीचे नेता चंद्रशेखर आझाद कानपूरमध्ये मुक्कामी आहेत. त्यांना चंद्रशेखर आझाद यांना भेटण्याची इच्छा होतीच म्हणून ते कानपूरला गेले.
कानपूरला मागील वर्षी यांचा श्री विद्यार्थीजीकडे मुक्काम राहिला असल्याने कुठे रहावे हा प्रश्न निर्माण झाला नाही. विद्यार्थीजींकडे जाऊन भगतसिंहानी आझाद यांना भेटण्याची आपली इच्छा प्रकट केली. विद्यार्थीजींनी लवकरच तसा योग घडवून आणला.
चंद्रशेखर आझादशी भगतसिंहांची समाधानकारक भेट झाली. जणू त्यांना आझाद सारखेच सहकारी हवे होते. त्यांच्यासोबत राहून संपूर्ण ताकदीनीशी क्रांतीज्योत प्रज्वलीत करता येईल हा विश्वास भगतसिंहांना आला.
दशहरा बाँब केसमध्ये अटक
इ.स. १९२४ ते १९२५ मध्ये लाहोरहून दिल्ली व तेथून कानपुर असा भगतसिहांचा प्रवास झाला. आझादशी भेट झाल्यानंतर 'नौजवान भारत सभा' अशा नावाची संस्था सुरू करण्याचा निर्णय करण्यात आला. ही सभा स्थापन करण्यासाठी भगवतीचरण बोहरा यांचे सहकार्य लाभले.
सशस्त्र क्रांतीचळवळीची रूपरेषा तयार करून 'नौजवान भारत सभेला' मजबूत करण्यासाठी ते लाहोरला परत यायचा मानस यांनी बनविला व कानपूरहून परत यायला निघाले. इ.स. १९२५ मध्ये दोन मोठ्या घटना घडल्या. ९ ऑगस्टला काकोरी रेल्वे स्टेशनवर क्रांतीकारकांनी सरकारी खजिना लुटला व यानंतर काही महिन्यांनी लाहोरला दसरा मेळाव्यावर बाँब स्फोट झाला. काकोरी कटातील व दसरा मेळाव्यावर बाँब टाकणाऱ्या संशयितांची सरकारने धरपकड सुरू केली.
सरकारचा संशय भगतसिंहांकडेही वळला. मागील वर्षी अकालींना केलेल्या मदतीमुळे भगतसिंहांवर आधीच अटक वॉरंट निघालेले होते. आणि तेव्हापासून ते लाहोरमध्ये किंवा पंजाब प्रांतात इतरत्रही कुठे दिसले नाही म्हणून त्यांच्यावरचा सरकारचा संशय बळावला.
पंजाबप्रांतात सगळीकडे सरकारच्या पोलीसांची नजर त्यांना शोधत होती. कानपूरहून लाहोरच्या गाडीत बसताना सुरवातीला याची कल्पना भगतसिंहांना आली नाही पण अमृतसरला गाडी येईपर्यंत त्यांना नक्की वाटू लागले की, पोलीस आपल्यावर पाळत ठेऊन आहेत. हा संशय खरा की खोटा हे तपासायला अमृतसर स्टेशनवर गाडी थांबताच ते स्टेशनमधून बाहेर आले.
कारण भगतसिंहांचा हा संशय खराच ठरला. ते स्वतःला लपवीत एका घरात शिरले. हे घर ॲडव्होकेट शार्दुलसिंह यांचे होते. भगतसिंहांनी स्वतःचा परिचय त्यांना दिला. पोलीस मागावर असल्याचे सांगून व आपले पिस्तुल त्यांच्याकडे देऊन आश्रय देण्याची विनंती केली.
शार्दूलसिंहनी वेळेचे भान ठेऊन त्यांना आश्रय दिला पोलीस विचारणा करीत आले. पण हुशार वकील असलेल्या शार्दुलसिंहानी एका क्षणात पोलीसांची दिशाभूल करण्यासाठी 'तुम्ही विचारणा करीत असलेला तरूण समोरच्या इमारतीत गेला असे खोटेच सांगितले. पोलीसांनी समोरच असलेल्या किर्ती मासिक कचेरीला वेढा दिला. पण तेथे त्यांना भगतसिंह मिळणारच कसे? नेहमीप्रमाणे शेवटी पोलीसांना रिकाम्या हातानेच परतावे लागले.
अॅड. शार्दुलसिंह क्रांतीकारकांशी सहानुभुती ठेवायचे. त्यांनी भगतसिंहांचाही यथोचित आदरसत्कार केला. त्यांना नास्ता वगैरे देऊन अंधार पडल्यावर लाहोरकडे रवाना केले. पण लाहोरला पोहचल्यावर मात्र दैव आड आले. इथे पोलीस आणखीच सतर्क झाले. भगतसिंह पोहचल्याबरोबर टांग्यात बसले आणि पोलिसांनी त्यांना तिथेच वेढले व हातकड्या टाकून कोतवालीत आणले. 'आज अटक होणार होतीच' असेच म्हणावे लागेल ! दशहरा बाँबकेसमध्ये ही अटक केली होती.
लाहोरमध्ये भगतसिंहांच्या अटकेची बातमी पसरली. लोकांचा त्यावर विश्वासच बसत नव्हता. सरकारलाही यांच्यावरचा आरोप सिद्ध करता आला नाही. पोलिसांचा हस्तक चननदीन यानीच हे कृत्य केल्याचे उघडकीस आले.
आरोप सिद्ध झाला नसला तरी क्रांतीकारी असल्यामुळे सरकारचा भगतसिंहांवरचा राग गेला नाही. म्हणून भगतसिंह हा सरकारविरोधात काम करणारा आहे असा रिपोर्ट लाहोर पोलीसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला आणि त्यांना दंडीत करण्याची मागणीही केली. त्यानुसार त्यांना साठ हजार रुपयांचे जामीन सरकारकडून मागितल्या गेले.
किशनसिंहांच्या दोन जिवाभावाच्या मित्रांनी ही मोठी रक्कम भरली व भगतसिंहांची सुटका झाली. पण त्यांच्या अटकेचा विषय नेतेमंडळींनी पंजाब असेंब्लीत उभा केला. खटला न भरता जामीन का मागितला? असा प्रश्न पंडित बोधराज यांनी असेंब्लीमध्ये सरकारला केला.
डॉ. सत्यपाल यांनी आपण या केसबद्दल कौन्सीलकडे जाऊ अशी नोटीस दिली. कौन्सीलमध्ये जर ठरावावर एकमत झाले तर सरकारला उत्तर देणे कठीण जाईल असे विश्वासपूर्वक वाटल्यामुळे त्यांचा जामीन रद्द केला. अशा प्रकारे या दशहरा बाँब केस प्रकरणाचा शेवट झाला.
इन्कलाब जिंदाबाद
दशहरा बाँब केस अटक प्रकरण संपल्यानंतर किशनसिंहनी भगतसिंहला चळवळीपासून दूर ठेवण्याकरिता लाहोरजवळ खासरियाँ या गावी दूध डेअरी सुरू करून दिली. लाहोरला दूध पोचविण्याची जबाबदारी भगतसिंहांवर सोपविली. त्यामुळे जवळजवळ दोन वर्ष त्यांना चळवळीकडे लक्ष देता आले नाही.
या दरम्यान संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणाऱ्या दोन महत्त्वपूर्ण घटना घडल्या. पहिली घटना म्हणजे काकोरी खटल्यातील आरोपींना फाशीची शिक्षा. या खटल्यात रामप्रसाद बिस्मिल, रोशनसिंह, अशफाकउल्ला व राजेंद्र लाहिडी यांना आरोपी ठरविण्यात आले होते. त्यांना मदत करण्यासाठी पं. नेहरू, श्री विद्यार्थीजी, बॅरीस्टर चौधरी, गोविंद वल्लभ पंत व अनेक नेते पुढे आले. हा खटला एक वर्ष चालला पण सरकारने निर्णय आधीच ठरवून ठेवला होता. या चौघांनाही १९ डिसेंबर १९२७ ला वेगवेगळ्या जेलमध्ये फाशी देण्यात आली.
दुसरी घटना म्हणजे महान क्रांतीकारी लाला लजपतराय यांच्यावर पोलीसांचा लाठीहल्ला झाला व या लाठीमारातच त्यांचा मृत्यु झाला. एका महान देशप्रेमीला देश मुकला होता.
काकोरी खटल्यातील निर्णयामुळे देशात प्रचंड क्षोभ निर्माण झाला. १९२५ मध्ये कानूपर अधिवेशन श्रीमती सरोजिनीदेवी नायडु यांच्या अध्यक्षतेत पार पडले. या अधिवेशनात 'स्वदेशी' वर भर देण्यात आला. १९२६ ला गोहाटी येथे श्री श्रीनिवास अयंगार यांच्या अध्यक्षतेत अधिवेशन झाले. पुढल्या वर्षी सायमन कमिशन भारतात येणार असल्यामुळे जनतेच्या असंतोषामध्ये अधिकच भर पडली. मद्रास येथील अधिवेशनात कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा ठराव पास झाला.
३ फेब्रुवारी १९२८ ला सायमन कमिशन आले. त्यात एकही हिंदी प्रतिनीधी नसल्याने असंतोष अधिकच भडकला. भारताला सुधारणा देण्यासाठी सायमन कमिशन आले होते. पण हा केवळ हा केवळ धूर्त इंग्रजांचा देखावा आहे हे हिंदुवासीयांना या आधी दोनदा समजून आले होतेच. १९०९ ला 'मोर्ले मिंटो कमिशन' व माँटेग्यू चेम्सफर्ड यांनी दिलेल्या जुजबी सुधारणांवरून हे चांगलच कळले होते.
मुंबई, पुणे, लखनौ, पाटणा, मद्रास इ. सर्व ठिकाणी सायमन कमिशनला चांगलाच विरोध झाला. 'गो बॅक सायमन' च्या घोषणा दुमदुमल्या. पंजाबातही कमिशन येणार होते. जुलै १९२८ मध्ये सगळ्या प्रांतांतील क्रांतिकारकांनी आपल्या संघटना मजबूत करण्याचे ठरविले. त्यासाठी ८ ऑगस्टला दिल्लीला बैठक भरविली. या बैठकीचे आमंत्रण भगतसिंहांनाही गेले.
दूध डेअरीमध्येही त्यांनी क्रांतीचे कार्य सुरूच ठेवले होते. 'किर्ती' व 'अकाली' या वर्तमानत्रात लोकजागृती करणारे लेख लिहितच होते. दिल्ली बैठकीचे आमंत्रण मिळताच डेअरीला रामराम ठोकून त्यांनी दिल्ली गाठली. त्यानंतर मात्र यांचे कधी घरी येणे शक्य झाले नाही.
८ ऑगस्ट १९२८ ला बैठक भरली. चंद्रशेखर आझाद, सुखदेव, विजयकुमार सिन्हा, ब्रम्हदत्त, भगतसिंह सुरेश पांडे, राजगुरू, भगवतीचरण, महवीरसिंह आणखीही इतर मंडळी उपस्थित होती. काही महिलांचाही सहभाग होता. बैठकीमध्ये एकमुखाने 'इन्कलाब जिंदाबाद'ची गर्जना दुमदुमली. पार्टीच्या पूर्वीच्या नावात सुधारणा होऊन 'हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लीकन आर्मी' असे पार्टीचे नामकरण झाले. चंद्रशेखर आझाद नेता होते. कार्यकारीणीत भगतसिंह, सुखदेव यांचा समावेश त्यांनी केला.
प्रत्यक्ष कार्य करणारे एका गटात व त्यांना मदत करणारे दुसऱ्या गटात अशी विभागणी झाली. सायमन कमिशनला विरोध करण्याचा पहिला कार्यक्रम ठरविला गेला.
राष्ट्रीय वीरपुरुष
१९२८ ला क्रांतीसंघटनेचे जे स्वरूप स्पष्ट झाले त्यात भगतसिंहांनी निश्चय केला की क्रांतिकार्यालाच वाहून घ्यायचे. मागील वर्षी फासावर गेलेल्या क्रांतिकारकांनी मातृभूमीप्रती जी भावना स्पष्ट केली ती या क्रांतिकारकांच्या बाहुंना स्फूरण देत होती.
'सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है'
फाशी गेलेल्या सर्वांनी जी वीरता शिक्षा भोगाताना दाखविली ती पाहता प्रत्येक क्रांतीकारक इच्छा करू लागला की, देशाकरिता हसत-हसत बलीदान करायचे. या कर्तव्यापुढे नातेगोते, आप्त-मित्र सर्वकाही विसरायला ते तयार होते.
अशफाकउल्ला या फाशीची शिक्षा झालेल्या क्रांतिकारकाला त्यांच्यावतीने लढणाऱ्या वकीलाने किती वेळा सांगितले "आपला बचाव करा', पण त्याचा विचार ठाम होता. त्याचे मत होते की 'मी फार नशीबवान आहे की देशाच्या स्वातंत्र्याकरिता माझे आयुष्य कामी आले.' हे वीर हसत-हसत फाशी गेले. त्यांनी घडविलेला इतिहास आपल्यालाही घडविण्याची चढाओढच या क्रांतिकारकांमध्ये लागली होती.
चंद्रशेखर आझादशी भेट झाल्यापासून अग्नीला हवेची जोड मिळाली होती. तनमनधनाने क्रांतीचळवळीत उडी घ्यायची भगतसिंहाने ठरविले. इंग्रजांनी आपल्याला ओळखू नये म्हणून यांनी डोक्यावरचे केस कापले व दाढी काढून टाकली. त्यांचा त्वेष पाहुन संघटनेतील सदस्यांनी त्यांना कार्यकारीणीत नियुक्त केले.
भगतसिंहांनी आतापर्यंत फक्त आपल्या प्रांतात कार्य केले होते, पण आता राष्ट्रकार्यात सामील व्हायचे होते, वीरपुरुषाचे कार्य घडवायचे होते. १९२८ मध्ये त्यांनी निर्णय केला की संपूर्ण आयुष्य देशाच्या स्वातंत्र्याकरिताच अर्पण करायचे. इंग्रजांनी आपल्याला ओळखु नये म्हणून यांनी आपल्या डोक्यावरील केस कापले. एवढेच नाही तर आपली दाढीसुद्धा काढली. त्यांचा क्रांतीकार्यातील त्वेष पाहुन संघटनेतील सदस्यांनी त्यांना आपल्या केंद्रिय कार्यकारिनीत नियुक्त केले.
संकल्पामुळे कार्याला गती मिळते. सशस्त्र क्रांतीचा संकल्प ठरला. त्याकरिता बाँब हवे होते. बाँब आपणच तयार करायचे असे भगतसिंहाने ठरविले. बाँब बनविण्याचे शिक्षण बंगालमध्ये मिळत असल्याचे त्यांना माहित होते म्हणून त्यांनी आपला मुक्काम कलकत्त्याकडे हलविला. तेथे प्रसिद्ध क्रांतिवीर जतींद्रनाथ दास यांच्याकडून त्यांनी बाँब बनविण्याचे प्रशिक्षण घेतले.
फेब्रुवारी १९२८ मध्ये इंग्लंडहून भारतात सायमन कमिशन आले. मुंबई, पुणे, पटना, लखनौ, मद्रास , इ. ठिकाणाहून नंतर लाहोर या ठिकाणी कमिशनची पावले पडली. प्रत्येकच ठिकाणी ठरल्याप्रमाणे कमिशनला प्रचंड विरोधही झाला. लाहोरलाही स्थिती यापेक्षा वेगळी नव्हती.
ऑक्टोबर महिन्यात लाहोरला आलेल्या या कमिशनला विरोध दर्शविण्याकरिता 'नौजवान भारत सभा' संघटनेने प्रचंड मोर्चाचे आयोजन केले. हजारोंच्या संख्येने लोक स्वखुषीने आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांचे नेतृत्व वंदनीय नेते लाला लजपतराय यांच्याकडे होते. मोर्चा इतका प्रचंड होता की कमिशनला जायला रस्ताच नव्हता.
'गो बॅक सायमन' चे नारे लागत होते. लोक बाजूला हटत नाहीत हे पाहन सुपरिटेन्डेन्ट स्कॉट यांनी लाठीहल्ला करविला. याच लाठीहल्ल्यामध्ये लाला लजपतराय जखमी झाले व नंतर यांचा त्यातच मृत्यु झाला. लालाजींच्या मृत्यूने संपूर्ण हिंदुस्थानात संतापाची लाट उसळली. शोकसभेत देशबंधू चित्तरंजन दास यांच्या पत्नी वासंतीदेवी गरजल्या, 'आपल्या वंदय नेत्याच्या चितेचे निखारे विझण्याआधी या कृत्याचा आपण बदला घेतला पाहिजे' आणि क्रांतिकारकांनी असेच घडवले.
लालाजी पंजाबमधील लोकप्रिय नेता होते. त्यांच्या मृत्यूचा बदला घ्यायचे क्रांतिकारकांनी ठरविले. १० डिसेंबरला क्रांतिकारकांनी स्कॉटला मारण्याची योजना आखली. चंद्रशेखर आझाद, भगतसिंह, राजगुरू व जयगोपाल यांना स्कॉटला मारण्याच्या योजनेत सहभागी केले. १५ डिसेंबरला या योजनेवर शेवटचा विचार झाला.
१७ नोव्हेंबरला लालाजींचा मृत्यू झाला आणि डिसेंबर महिन्याच्या १७ तारखेलाच स्कॉटला मारण्याचा योग जुळून आला. योजनेप्रमाणे आझाद, भगतसिंह, राजगुरू हे गोळ्या झाडणार होते, तर जयगोपाल इशारा करणार होते. नेमके त्या दिवशी मिस्टर डेप्युटी सुपरिटेन्डेन्ट साँडर्स स्कॉटच्या ऑफीसमध्ये आले होते. ते काम आटोपून बाहेर पडले.
इथे जयगोपालची चूक झाली. तो साँडर्सलाच स्कॉट समजला व त्याने रूमाल हलवून इशारा केला. ठरल्याप्रमाणे या तिघांनी पटापट गोळया झाडल्या व स्कॉटऐवजी सॉडर्स मारल्या गेला. त्याच क्षणी या तिघांनी धूम ठोकली. एका शिपायाने भगतसिंहांना पकडायचा प्रयत्न केला पण आझादनी त्याच्यावर गोळी झाडली. त्याला उपचारार्थ दवाखान्यात दाखल करण्यात आले. तेथे त्याने सांगितले की मारेकऱ्यांमध्ये एक शीख तरूण होता.
सर्वजण जवळच्या दयानंद कॉलेजमध्ये घुसले व तेथून नंतर मोतीबागमध्ये मोझांग हाऊसमध्ये जमा झाले. या खुनामुळे लाहोरमध्ये भयंकर खळबळ उडाली. सगळीकडे मारेकऱ्यांची शोधाशोध सुरू झाली.
दुसऱ्या दिवशी साँडर्स इज डेड - लालाजी इज अॅव्हेंज्ड' अशा मजकुराची पत्रके निघाली. इंग्रज सरकारला या पत्रकातून सावधानतेचा इशारा दिला गेला होता. 'हिंदुस्तान समाजवादी प्रजातंत्र सेना' या संघटनेने हे कृत्य केल्याचे यात नमुद केले होते.
या चौघांनाही लाहोरमध्ये राहणे धोकादायक होते. सर्वप्रथम जयगोपालला लाहोरबाहेर पाठविले. नंतर भगतसिंहांनी वेषांतर केले व भगवतीचरण यांच्या पत्नी दुर्गाभाभींना आपल्या पत्नीच्या भूमीकेत सोबत घेतले व राजगुरूला नोकराच्या वेशात घेऊन कलकत्ता मेलने प्रवास सुरू केला.
याच गाडीत आझाद साधुच्या वेषात बसले. गाडी लखनौला पोहचताच आझाद व राजगुरू उतरले. दुर्गाभाभी व भगतसिंह मात्र कलकत्त्याला उतरले. कलकत्त्याला दुर्गाभाभींच्या ओळखीने सुशिलादीदींकडे भगतसिंहांची राहण्याची व्यवस्था झाली. एवढ्यातच दुर्गाभाभींचे पती भगवतीचरण काँग्रेस अधिवेशनात सहभागी होण्यासाठी सुशिलादीदीकडे मुक्कामी आले होते. भगतसिंहांची ओळख दीदींनी सर्वांना आपला भाचा म्हणून करून दिली.
या कलकत्ता मुक्कामात बंगाली पद्धतीने वेशांतर करून भगतसिंहने काँग्रेस अधिवेशनात भाग घेतला. अध्यक्षस्थानी पं. नेहरू होते. इथे त्यांना कुणीही ओळखू शकले नाही. वेशांतर करण्यात क्रांतिकारकांनी कौशल्यच प्राप्त केले होते.
असेंब्लीत बाँब फेकले
भगतसिंहाच्या कलकत्ता येथील मुक्कामात पुढील वर्षी असेंब्लीत बाँब फेकण्याची योजना आकार घेत होती. बाँब बनविण्याची कला अवगत असणाऱ्या जतिंद्रनाथ दास यांच्याशी चर्चा केली व त्यांच्याकडून प्रशिक्षण घेऊन येथेच एका खोलीत भगतसिंह, कमलनाथ तिवारी, विजयकुमार सिन्हा व फर्णिद्र घोष बाँब तयार करू लागले. बाँब तयार करण्याचे अर्धे कार्य आग्रा येथेही करावे लागले.
इ.स. १९२८ मधील नेते आणि जनतेचा विरोध लक्षात घेता सरकारने असेंब्लीत 'ट्रेड डिस्प्यूट बिल' व 'पब्लिक सेफ्टी बिल' पास करून घ्यायचा ठराव केला. यामुळे लेखनस्वातंत्र्यावर निर्बंध येणार होते. या जुल्मी कायदयांना विरोध जाहीर करण्यासाठी असेंब्लीतील कामकाज हे केवळ देखावा आहे हे जनतेच्या निदर्शनास आणण्यासाठी येथे बाँब टाकण्याची योजना होती. ही कामगिरी प्रथम बटुकेश्वर दत्त व विजयकुमार यांना दिली होती. पण भगतसिंहाने ती स्वतःकडे देण्याची गळ घातली.
ही कामगिरी झाल्यानंतर स्वतःला अटक करवून घेण्याचा प्रस्ताव भगतसिंहांनी ठेवला. कारण साँडर्सच्या हत्येनंतर मारेकऱ्यांच्या शोधादरम्यान सरकारने जनतेला फार त्रास दिला होता. निरपराध लोकांना त्रास होऊ नये म्हणून उघड विरोध दर्शविण्याचा हा प्रस्ताव त्यांनी मांडला.
८ एप्रिल १९२९ ला लेजिस्लेटिव्ह असेंब्लीत दोन्ही बिले सादर होणार होती. त्यासाठी हिंदुस्थानी नेत्यांचा व जनतेचा विरोध असूनही व्हॉईसराय आपल्या अधिकाराने ती बिले पास करून घेणार होते. म्हणूनच 'हिंदुस्थानी समाजवादी प्रजातंत्र दलाने' सशस्त्रमार्गाने विरोध दर्शवायचे ठरवले.
जयदेव कपूरने असेंब्लीत प्रवेश मिळवून आतील व्यवस्था बघून घेतली. त्यानुसार त्यांना प्रेक्षक गॅलरीतं बसता येणार होते. योजनेप्रमाणे वेशांतर करून क्रांतिकारी असेंब्लीत बसले. तिथे आपलेही बरेच नेते बसलेले होते. व्हॉईसरॉयने दोन्ही बिले पास करीत असल्याची माहिती देताच भगतसिंह व बटुकेश्वर दत्त यांनी सोबत आणलेले बाँब सरकारी सभासद बसलेले होते त्या दिशेने टाकले. सगळीकडे धुरचधुर झाला.
प्रत्येकजण जीवाच्या भीतीने पळत सुटले. धूर निवळल्यानंतर सभागृहात फक्त बटुकेश्वर दत्त व भगतसिंह दोघेच उरले होते. बाँबमध्ये घातकी पदार्थ नसल्यामुळे जीवीत हानी झाली नव्हती. ते फक्त भीती निर्माण करण्याकरिता धूर सोडणारे बाँब बनविले होते. थोड्याच वेळात तेथे पोलीस आले. ठरल्याप्रमाणे दोघांनीही कोणताही विरोध न करता हातकड्या घालण्यासाठी हात पुढे केले.
आजन्म कारावासाची शिक्षा
सभागृहात अटक झाल्यानंतर भगतसिंह व बटुकेश्वर दत्त यांना दिल्लीला आणण्यात आले. त्यांचे बयान घेतले. पण त्यांनी स्वतःचे नाव, राहण्याचे ठिकाण इ. जुजबी माहिती दिली. पण सविस्तर माहिती देण्यास नकार दिला. २२ एप्रिलला दोघांनाही दिल्ली जेलमध्ये टाकले. येथून भगतसिंहांनी वडिलांना एक पत्र लिहिले. या पत्रात खटल्याबद्दल माहिती दिली. काळजी न करण्याविषयी वारंवार सांगितले. वकील करायची गरज नाही, भेटायला एकटेच यावे व येतांना गीतारहस्य, नेपोलियनचे चरित्र ही पुस्तके आणायला सांगितले.इकडे चंद्रशेखर आझादने झांशी क्रांतिसदस्यांची बैठक घेऊन त्यात भगतसिंह व दत्तला सोडविण्याच्या विचार केला.
३ मे १९२९ ला किशनसिंह बॅ. असफअली यांना सोबत घेऊन जेलमध्ये भेटायला आले. खटला चालविण्याचा भगतसिंहांचा विचारच नव्हता. पण वडिलांच्या आग्रहाखातर ते तयार झाले. ७ मे १९२९ ला मॅजिस्ट्रेट मि. पूल यांच्या समोर खटला सुरू झाला. जेलमध्येच खास कोर्टाची व्यवस्था केली होती. सरकारतर्फे श्री आर. बी. सूरज नारायण व भगतसिंह, दत्त यांच्या बाजूने असफअली यांनी काम पाहिले. खटल्याचे कामकाज पाहण्याचे निमित्त करून भगतसिंहची आई व काकू त्यांना भेटायला कोर्टात आल्या. दुपारच्या सुटीत त्यांना भगतसिंहांना भेटता आले.
बॅ. असफअली ज्या पद्धतीने बचाव कार्य करीत होते त्यानुसार बटुकेश्वर दत्तची सुटका होऊ शकत होती. पण दुःखात साथ न देतील ते मित्र कसले ? दत्तनी स्वतः सांगितले, 'जेवढी शिक्षा भगतसिंहांना होईल तेवढीच मलाही व्हावी. माझ्या शिक्षेत कसलीही कमी नको.' मित्रासाठी केवढी ही मनाची उदारता. अशी उदारता, विरता या क्रांतिकारकांच्या ठायी होती.
केसमधील संपूर्ण प्रकरणावर विचार करून मि. मिडलटन यांनी भगतसिंह व दत्त यांना १२ जून १९२९ ला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. भगतसिंहांना नियावली येथील तुरूंगात, तर दत्तला लाहोर तुरूंगात आणण्यात आले. तुरूंगातही यांच्यातील क्रांतीकारी जागाच होता. तुरूंगात कैदयांना चांगली वागणूक मिळावी म्हणून या दोघांनीही अन्नत्याग केला. हा अन्नत्याग ऑक्टोबरपर्यंत चालला.
फाशीची शिक्षा
बाँब खटल्यात आजन्म कारावासाची शिक्षा झाली पण सरकारचे एवढ्यावर समाधान झाले नाही. बाँब बनविण्याबद्दल सरकारने माहिती काढली. लाहोरमध्ये पोलिसांना येथील काश्मीर बिल्डींगमध्ये बाँब बनविले जात असल्याची माहिती मिळाली. तिथे त्यांनी धाड टाकली असता बातमी खरी निघाली. त्यांना एक मोठा बाँब, सहा छोटे बाँब व इतर साहित्य मिळाले. येथील बाँब व असेंब्लीतील बाँबचे तुकडे एकसारखे निघाले. या धाडीत सुखदेव, जयगोपाल, किशोरीलाल हे पोलिसांच्या हाती सापडले.
पोलीस तपासात जयगोपाल माफीचा साक्षीदार झालाच. व साँडर्सच्या खूनाचे धागेदोरे जुळले व या खूनाचाही खटला सुरू झाला. दहा जुलैपर्यंत साँडर्स खुनाची चौकशी पूर्ण झाली. मॅजिस्ट्रेट श्री श्रीकृष्ण यांच्यासमोर सुनावणीचे कामकाज सुरू झाले. दुसऱ्या दिवशी आरोपींनी कोर्टात येण्यास नकार दिला. पोलिसांनी आरोपींना मारहान केली. प्रकरण चिघळल्यामुळे खटला सेशन कोर्टाकडे वळला.
१ मे १९३० पासून व्हॉईसरॉय आयर्विन यांनी एक तीन सदस्यीय कमेटी नेमून या खटल्याचे कामकाज पुढे चालविले. पुढे २६ ऑगस्टपर्यंत त्रीसदस्यीय कमेटीने खटल्याचे काम पूर्ण केले. साक्षीदारांच्या साक्षी व प्रकरण या आधारे ७ ऑक्टोबर १९३० ला जस्टिस हिल्टन, जस्टिस अब्दुल कादीर व जस्टिस जे. के. टेप यांनी भगतसिंह, राजगुरू, सुखदेव यांना इंडियन पिनल कोड कलम ३०२ खाली फाशीची शिक्षा सुनावली.
सुखदेवला लाहोरला अटक केली. राजगुरूला पुण्याला लाहोर पोलिसांनी स्थानीक पोलिसांच्या मदतीने अटक केली होती. क्रांतिकारकांचे नेते चंद्रशेखर आझाद सुरवातीपासून पोलीसांच्या हाती लागले नाही. यांना पकडायला पोलिसांनी हजारो रुपयांचे बक्षिस ठेवले होते. या खटल्यात माफीचा साक्षीदार झालेल्या फणींद्रनाथ घोष यांना घेऊन पोलिसांनी झांशीला यांना पकडायचा प्रयत्न केला पण त्यात त्यांना यश आले नाही.
२७ फेब्रुवारी १९३१ हा मात्र आझाद यांच्याकरिता दुर्दैवी दिवस निघाला. वीरभद्र तिवारी या क्रांतिसंघटनेतील सदस्याने पोलीसांना सामील होऊन आझाद यांच्या उपस्थितीबद्दलची माहिती दिली. या दिवशी पोलिसांशी आझादची चकमक झाली. या झटापटीच्या वेळी आझादच्या पिस्तुलात फक्त एक गोळी शिल्लक राहिली होती. त्यांना आपल्या शपथेची आठवण होतीच, "जिवंत असेपर्यंत पोलिसांच्या हाती सापडणार नाही.' ती पूर्ण करण्याकरिता त्यांनी ती गोळी स्वतःच्या डोक्यात घालून स्वतःला संपविले. असे हे वीर देशप्रेमी होते.
१ मे १९३० पासून व्हॉईसरॉय आयर्विन यांनी एक तीन सदस्यीय कमेटी नेमून या खटल्याचे कामकाज पुढे चालविले. पुढे २६ ऑगस्टपर्यंत त्रीसदस्यीय कमेटीने खटल्याचे काम पूर्ण केले. साक्षीदारांच्या साक्षी व प्रकरण या आधारे ७ ऑक्टोबर १९३० ला जस्टिस हिल्टन, जस्टिस अब्दुल कादीर व जस्टिस जे. के. टेप यांनी भगतसिंह, राजगुरू, सुखदेव यांना इंडियन पिनल कोड कलम ३०२ खाली फाशीची शिक्षा सुनावली.
सुखदेवला लाहोरला अटक केली. राजगुरूला पुण्याला लाहोर पोलिसांनी स्थानीक पोलिसांच्या मदतीने अटक केली होती. क्रांतिकारकांचे नेते चंद्रशेखर आझाद सुरवातीपासून पोलीसांच्या हाती लागले नाही. यांना पकडायला पोलिसांनी हजारो रुपयांचे बक्षिस ठेवले होते. या खटल्यात माफीचा साक्षीदार झालेल्या फणींद्रनाथ घोष यांना घेऊन पोलिसांनी झांशीला यांना पकडायचा प्रयत्न केला पण त्यात त्यांना यश आले नाही.
२७ फेब्रुवारी १९३१ हा मात्र आझाद यांच्याकरिता दुर्दैवी दिवस निघाला. वीरभद्र तिवारी या क्रांतिसंघटनेतील सदस्याने पोलीसांना सामील होऊन आझाद यांच्या उपस्थितीबद्दलची माहिती दिली. या दिवशी पोलिसांशी आझादची चकमक झाली. या झटापटीच्या वेळी आझादच्या पिस्तुलात फक्त एक गोळी शिल्लक राहिली होती. त्यांना आपल्या शपथेची आठवण होतीच, "जिवंत असेपर्यंत पोलिसांच्या हाती सापडणार नाही.' ती पूर्ण करण्याकरिता त्यांनी ती गोळी स्वतःच्या डोक्यात घालून स्वतःला संपविले. असे हे वीर देशप्रेमी होते.
मार्च महिना सुरू झाला. ३ मार्चला भगतसिंह, राजगुरू व सुखदेव यांच्या कुटुंबियांनी यांची लाहोर तुरूंगात भेट घेतली. या भेटीत भगतसिंहाने आपल्या वडिलांना सांगितले की, आझाद यांच्या मृत्युमुळे संघटना जिवंत राहण्यासाठी तीचे नेतृत्व पृथ्वीसिंहकडे सोपवायचे प्रयत्न करा.'
पृथ्वीराजसिंह आझाद हे गृहस्थ १९१६ ते १९२१ या कालावधीमध्ये राजद्रोहाची शिक्षा अंदमानच्या तुरूंगात भोगून आले होते. महाराष्ट्रात बाबा सावरकर (गणेश दामोदर सावरकर) बरोबर पृथ्वीसिंहचे देशकार्य सुरू असण्याची माहिती भगतसिंहांना होती.
५ मार्चला महात्मा गांधी व व्हॉईसरॉय लॉर्ड आयर्विन यांच्यात १६ कलमी करार झाला. कलम ९ मध्ये ज्यांनी हिंसाचाराचा अवलंब केला नाही त्या कैदयांना तुरूंगातून मुक्त केल्या जाईल असे स्पष्ट केले होते. त्यामुळे भगतसिंह, राजगुरू व सुखदेव यांची सुटका होणार नव्हती.
फाशी होऊ नये म्हणून किशनसिंह यांनी हायकोर्टात केलेला अर्ज नामंजूर केला गेला. तिघांनीही व्हॉईसरॉयकडे दयेचा अर्ज केल्यास फाशी रद्द होण्याची शक्यता आहे असे लोकांना वाटू लागले. यांचे वकील प्राणनाथ मेहता यांच्यावर ही कामगिरी सोपविली गेली.
१९ मार्चला दयेच्या अर्जाचा मसुदा घेऊन प्राणनाथ मेहता तुरूंगात या तिघांकडे आले पण भगतसिंहाने यांनी आणलेल्या दयेच्या अर्जाच्या मसुद्यावर सही करण्याऐवजी आपण गव्हर्नरकडे आधीच पाठविलेला अर्ज दाखविला. या क्रांतिकारकांनी इंग्रजांची दया नको होती. त्यापेक्षा देशाच्या स्वातंत्र्यासाठी शहीद होणेच त्यांना जास्त आवडणार होते. म्हणून त्यांनी अर्जातही आपला मानस व्यक्त केला होता.
आपल्या अर्जात त्यांनी एवढेच लिहिले होते की, 'आम्हाला फाशी देण्याऐवजी गोळ्या घालून मृत्यू दयावा.' प्राणनाथ मेहतांची हा अर्ज वाचून निराशा झाली. ते काहीच करू शकत नव्हते. शेवटी सरकारी वकील कॉर्डन चॉल यांना कोर्टाकडून या तिघांच्या फाशीचा हुकुम मिळाला.
किशनसिंहांना ही बातमी लागताच कुटुंबियांना घेऊन अतिशय जड मनाने ते तुरूंगात भगतसिंहांना भेटायला आले पण कुर इंग्रज सरकारने त्यांना अखेरच्या भेटीचीही परवानगी न दिल्यामुळे त्यांची भगतसिंहांशी भेट होऊ शकली नाही.
अखेर २३ मार्च हा फाशीचा दिवस उजाडला. भगतसिंह आपल्या एका बाजूला राजगुरू व दुसऱ्या बाजूला सुखदेवला घेऊन क्रांतीज्योत तेवत ठेवण्याच्या उद्देशाने 'इन्कलाब जिंदाबाद'च्या घोषणा देत देशस्वातंत्र्यासाठी हसत-हसत शहीद होण्याकरिता फाशीच्या दोराकडे निघाले. सायंकाळी बरोबर साडेसात वाजता लाहोर तुरूंगात या तिन्ही महान क्रांतिकारकांना फाशी देण्यात आली.
सतलज नदीकाठी सरकारने या वीरांवर गुप्तपणे अंत्यसंस्कार केले. भारतमातेचा जयजयकार करीत हे वीर हुतात्मा झाले आणि यांच्यामधील देशभक्ती इतिहासात अजरामर झाली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत