information about mahatma gandhi in marathi | महात्मा गांधी मराठी माहिती
जन्म : २ ऑक्टोबर १८६९
मृत्यु : ३० जानेवारी १९४८
आधुनिक जगाला न्याय्य गोष्टी हिंसेऐवजी अहिंसेच्या मार्गाने मिळविण्याचा संदेश देणाऱ्या : मोहनदास करमचंद तथा महात्मा गांधी यांचा जन्म काठेवाडात पोरबंदर येथे झाला. त्यांचे वडील पोरबंदर संस्थानचे दिवाण होते. ते त्याचप्रमाणे आई पुतळीबेन अत्यंत धर्मशील होती. घरातले वातावरण अत्यंत सात्त्विक असूनही वाईट मित्रांच्या संमतीमुळे गांधीजींच्या हातून काही वाईट गोष्टी घडल्या. पण लवकरच त्यांना त्याबद्दल पश्चात्ताप होऊन ते चांगल्या मार्गाला लागले. त्यांचे लग्न ते १३ वर्षांचे असताना त्याच वयाच्या कस्तुरबांशी झाले. सन १८८५ मध्ये त्यांचे वडील वारले आणि दोन वर्षांनंतर ते मॅट्रिक झाल्यावर त्यांच्या वडीलभावाने त्यांना बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला पाठवायचे ठरविले. पण आई त्यांना जायला परवानगी देईना. अखेर तिच्या इच्छेनुसार 'दारू, मांसाहार व परस्त्री यांना मी स्पर्श करणार नाही,' असे तिला वचन देऊन ते इंग्लंडला गेले व १८९१ च्या जून महिन्यात बॅरिस्टर होऊन भारतात परतले. पण ते येण्यापूर्वीच त्यांची आई निधन पावली होती.
information-about-mahatma-gandhi-in-marathi |
स्वदेशी परतल्यावर काही दिवस त्यांनी मुंबईत वकिली केली. पण तीत त्यांना यश मिळेना. त्याच वेळी दक्षिण आफ्रिकेतील एका मुसलमान व्यापाऱ्याने त्यांना त्याचा दावा चालविण्यासाठी एक वर्षाच्या कराराने तिकडे नेले. तिथे त्यांनी त्याचे काम तडजोडीने केले व दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या भारतीयांवर लादलेल्या जाचक कायद्यांविरुद्ध सर्व भारतीयांना संघटित करून तिथल्या गोऱ्या सरकारविरुद्ध सत्याग्रहाचे रणशिंग फुकले.
एक वर्षाकरिता तिकडे गेलेले गांधीजी तिथे वीस वर्षे राहिले आणि मार, तुरुंगवास वगैरे त्रास सोसून पण तिथल्या लोकांवरील बहुतांश अन्याय दूर करून ते भारतात परतले. लोक त्यांना ‘महात्मा गांधी ' म्हणून संबोधू लागले.
भारतात आल्यावर त्यांनी चंपारण्यातील गोऱ्या मालकांच्या मळयात काम करणाऱ्या भारतीय मजुरांची बाजू घेऊन लढा केला व त्यांच्यावरील अन्याय दूर केला.
सत्याग्रह, सविनय कायदेभंग , निःशस्त्र प्रतिकार, असहकारिता अशी नवी सुसंस्कृतपणाची साधने शोधून त्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत पुरुष, स्त्रिया, एवढेच नव्हे तर मुलांनाही सहभागी करून घेतले. त्यांनी जगाला एक नवा सुसंस्कृतपणाचा मार्ग दाखविला व देश स्वतंत्र केला. त्यांना देशाचे विभाजन मुळीच नको होते. पण बहसंख्य मुसलमानांचा पाठिंबा असलेली मुस्लीम लीग पाकिस्तानचा हट्ट सोडेना म्हणून त्यांना त्याला मान्यता द्यावी लागली. पण त्यांच्याचमुळे देशाचे विभाजन झाले व त्यांनी पाकिस्तानला ५५ कोटी रुपये द्यायला भारत सरकारला भाग पाडले, ' या विचारांमुळे रागावलेल्या एका तरुणाने ते दिलीत प्रार्थना करीत असता त्यांच्यावर पिस्तुलाने गोळ्या झाडून त्यांचा जीव घेतला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत