INFORMATION MARATHI

Chandra Shekhar information in marathi 

चंद्रशेखर हे भारताचे आठवे पंतप्रधान होत. ते १० नोव्हेंबर १९९० ला पंतप्रधान झाले तेव्हा देशाची आर्थिकस्थिती अगदी डबघाईला आली होती. त्यामुळे आपल्या देशावर सोने परदेशात गहाण ठेवण्याची वेळ आली. त्यामुळे चंद्रशेखरांवर फार मोठे संकट आले. तरीही त्यांचे सरकार सात महिने तग धरुन राहिले.
चंद्रशेखर यांचा जन्म इब्राहीमपट्टी या उत्तर प्रदेशातील गावी मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात १ जुलै १९२७ रोजी झाला. त्यांचे पूर्ण नांव चंद्रशेखर सदानंदसिंग. त्यांचे प्राथमिक शिक्षण खेड्यातच झाले. 

Chandra-Shekhar-information-in-marathi
Chandra-Shekhar-information-in-marathi

१९४५ साली त्यांनी जॉर्ज मेमोरियल शाळेमधून मॅट्रिकची परीक्षा दिली. विद्यार्थीदशेतच त्यांचा विवाह दुजादेवी यांच्याशी झाला. अलाहाबाद विद्यापीठातून त्यांनी राज्यशास्त्रात एम्. ए. ची पदवी मिळवली. त्यानंतर 'राजकीय चळवळीवरील आर्थिक सिद्धातांचा परिणाम' हा विषय त्यांनी पीएच्. डी. च्या संशोधनासाठी निवडला होता. परंतु याचवेळी ते आचार्य नरेंद्रदेव यांच्या प्रभावामुळे समाजवादी चळवळीकडे आकृष्ट झाले आणि उत्तर प्रदेश शाखेचे ते पूर्णवेळ सहसचिव झाले. १९५५ मध्ये ते सक्रीय राजकारणात आले. त्यांनी प्रजा सोशलिस्ट पार्टीच्या तिकीटावर निवडणूक लढविली आणि राज्यसभेत प्रवेश केला.

 यानंतर चंद्रशेखर यांच्या राजकीय विचारांना अशोक मेहता यांच्यामुळे कलाटणी मिळाली व ते काँग्रेसपक्षात १९६५ मध्ये दाखल झाले. ते त्यावेळी काँग्रेसमध्ये तरुणतुर्क' या नावाने ओळखले जात असत. इंदिरा गांधींसाठी त्यांनी प्रचार केला आणि  सिंडिकेट ' नावाने ओळखल्या जाणाऱ्या चौकडीविरुद्ध पक्षांतर्गत बंड पुकारले. काँग्रेसपक्षात फूट पडली, तेव्हाही त्यांनी इंदिरा गांधीना साथ दिली आणि बँकांचे राष्ट्रीयीकरण, राजे लोकांचे तनखे रद्द करणे इ. दहाकलमी आर्थिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात पुढाकार घेतला. 'गरीबी हटाव' हा लोकाभिमुख कार्यक्रम ही चंद्रशेखर यांचीच अभिनव कल्पना होती.

परंतु सत्ता हाती आल्यावर इंदिराजीनी प्रजेची उपेक्षा केली. त्यांच्या व्यक्तिकेंद्रित निर्णयाविरूद्ध चंद्रशेखर यांनी 'यंग इंडिया' या साप्ताहिकातून घणाघाती टीका केली. तेव्हा इंदिराजी नाराज झाल्या. त्यांनी चंद्रशेखर यांना नजरकैदेत ठेवले. जयप्रकाश नारायण यांनी देशात भ्रष्टाचारविरोधी संपूर्ण क्रांतीची चळवळ १९७४ मध्ये सुरु केली. तेव्हा चंद्रशेखर यांनी त्यांना पाठिंबा देऊन काँग्रेसपक्ष सोडला. आणीबाणीत चंद्रशेखर यांना स्थानबद्ध करण्यात आले होते. त्या संबंधीचे अनुभव चंद्रशेखर यांनी ' मेरीजेल डायरी' या पुस्तकात सांगितले आहेत.

चंद्रशेखरांच्या काम करण्याच्या पद्धतीवर जनता खूष होती. त्यामुळे त्यांना जनतादलाचे अध्यक्षपद देण्यात आले. १० वर्षे त्यांनी या पदाची धुरा सांभाळली व पक्षात फूट पडू दिली नाही. त्यांनी कन्याकुमारीपासून राजघाटापर्यंत सुमारे ४२६० कि. मी. एवढी प्रदीर्घ पदयात्रा केली. १९८८ मध्ये लोकदल व अन्य काही पक्ष एकत्र येऊन जनतादल या नवीन पक्षाची स्थापना झाली. चंद्रशेखर यांनी १० नोव्हेंबर १९९० रोजी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आणि आपल्या सरकारवर विश्वास संमत करुन घेतला. त्यांचे धोरण समन्वयवादी होते. काश्मीरप्रश्न चर्चेने सोडवावा, या मताचे ते होते.

 पुढे काँग्रेसने पाठिंबा काढून घेतल्यामुळे त्यांचे शासन १९९१ मध्ये संपुष्टात आले.  त्यांच्या बालिया मतदारसंघातून ते सातत्याने लोकसभेवर निवडून येत असतात. मात्र आता त्यांच्या पक्षाचे ते एकांडे शिलेदार आहेत. ते समाजवादाचे कट्टर पुरस्कर्ते आहेत. पंतप्रधान असतानासुद्धा त्यांची राहणी अगदी साधी होती. त्यांचा पोशाखही साधाच होता. विश्वास व सद्भाव या गुणांमुळे त्यांनी देश संघटित करण्याचा प्रयत्न केला. देशात व परदेशात अनेक भाषणे केली, त्यातून त्यांचा दूरदर्शीपणा दिसून येतो. त्यांना ८ जुलै २००७ रोजी देवाज्ञा झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत