H D deve gowda information in marathi
हरदनहळ्ळी दौड्डेगौडा देवेगौडा अशा नावाचे हे भारताचे दहावे पंतप्रधान होत. यांच्या ३५ वर्षांच्या राजकीय प्रवासाची कहाणी थक्क करुन सोडणारी आहे. संगणकाच्या क्षेत्रात बंगलोर हे शहर सर्वात आघाडीवर असल्याने त्याला 'सिलिकॉन व्हॅली' असे म्हटले जाते, याचे श्रेय देवेगौडा यानाच आहे. हसन जिल्ह्यातील होलेनरसीपूर तालुक्यातील हरदनहळ्ळी गावात देवेगौडा यांचा १८ मे १९३३ रोजी जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दोड्डगौडा. एच. डी. देवेगौडा हे व्यवसायाने शेतकरी आहेत.
H-D-deve-gowda-information-in-marathi |
परंतु त्यांनी सिव्हील इंजिनियरींगचा डिप्लोमा घेतला होता. काहीकाळ ठेकेदार म्हणून त्यांनी काम केले. १९६२ मध्ये कंत्राटदारीचा व्यवसाय बंद करून त्यांनी राजकारणातच उतरण्याचे ठरविले. १० वर्षे काँग्रेसचे काम करूनही त्यांना तिकीट नाकारण्यात आले. त्यामळे ते अपक्ष म्हणून उभे राहिले आणि निवडून आले. १९६९ साली ते पुन्हा काँग्रेसमध्ये आले. १९७२ च्या विधानसभा निवडणुकीत इंदिरा गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसने संघटना काँग्रेस'चा देशभरात धुव्वा उडविला होता. पण देवेगौडा मात्र निवडून आले आणि विरोधी पक्षाचे नेते बनले.
१९७८ सालापासून ते जनतादलाचे पुढारी बनले. १९८३ साली तेच कर्नाटकचे मुख्यमंत्री व्हायचे पण त्यावेळी रामचंद्र हेगडे मुख्यमंत्री झाले. पुढे १९९१ साली देवेगौडा लोकसभेवर निवडून गेले, १९९३ साली जनता दल व जनता पक्ष यांची युती झाली व जनतादलाला हुकमी बहुमत मिळाले. १९९४ साली देवेगौडा कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले.
राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात कोणत्याही प्रकारचा सहभाग नसलेला, पण राज्याचे राजकारण यशस्वीपणे करू शकणारा हा नेता या नंतर पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरला. १९९६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला किमान बहुमत मिळाले नाही. ज्योतिबसू, विश्वनाथ प्रतापसिंग यांनी पंतप्रधान होण्यास नकार दिला, अशाप्रकारे राजकीय अस्थिरता निर्माण झालेली असताना राष्ट्रीय आघाडीने नेतेपदाची जबाबदारी देवेगौडा यांच्यावर टाकली आणि १ जून १९९६ रोजी देवेगौडांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा कोणताही अनुभव नसताना त्यांनी वर्षभर पंतप्रधान म्हणून मोलाची कामगिरी केली. त्यांच्या कारकीर्दीमध्ये परदेशी कंपन्यांबरोबर २८ करार झाले. देशाची गुंतवणुकीची परिस्थिती थोडी सुधारली. बंगलोर संगणकाच्या क्षेत्रात आघाडीवर आले, याचे श्रेय देवेगौडा यांनाच द्यायला हवे. देवेगौडा यांना हिंदी भाषा येत नव्हती. पंतप्रधानांना राष्ट्रभाषा येत नाही, हे जनतेला मान्य नव्हते. देशातील वाद, अंतर्गत भांडणे यामुळे श्री. देवेगौडा फारकाळ या पदावर राह शकले नाहीत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत