P. V. Narasimha Rao information in marathi
P. V. Narasimha Rao यांचे संपूर्ण नांव पामुलपति वेंकट नरसिंहराव. हे भारताचे नववे पंतप्रधान होत. १९९१ ते १९९६ ते पंतप्रधान होते. देशाचे पंतप्रधान होणारे ते दक्षिण भारतातील पहिले नेते आहेत.
नरसिंहराव यांचा जन्म २८ जून १९२१ रोजी आंध्र प्रदेशातील करीमनगर या गावी झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण त्यांच्या जन्मगावी करीमनगर येथेच झाले. वरंगळ येथून त्यांनी मॅट्रिकची परीक्षा दिली. विद्यार्थीदशेतच त्यांनी हैद्राबाद स्टेट काँग्रेस, आर्यसमाजाद्वारे चालवल्या जाणाऱ्या सत्याग्रह चळवळीत भाग घ्यायला सुरूवात केली.
P-V-Narasimha-Rao-information-in-marathi |
हैद्राबादच्या निजाम सरकारच्या विरुद्ध बंड करून सुरू झालेल्या चळवळीत त्यांनी भाग घेतल्यामुळे त्यांना निजाम सरकारच्या उस्मानिया विद्यापीठातून काढून टाकण्यात आले. तेव्हा त्यांनी आपले पुढील शिक्षण नागपूर विद्यापीठातून आणि पुणे विद्यापीठातून पूर्ण केले. ते बी. एस्. सी. एल्. एल्. बी. झाले आहेत.
शिक्षण चालू असतानाच त्यांनी स्वत:ला वंदे मातरम् चळवळीत झोकून दिले होते. त्रिपूर येथे भरलेल्या काँग्रेस महासभेत त्यांनी भाग घेतला होता.
हैद्राबाद काँग्रेस कमिटीचे ते उपाध्यक्ष होते. सतत २० वर्षे ते आंध्र प्रदेश विधानसभेचे सदस्य होते. इ. स. १९५१ पासून ते अखिल भारत काँग्रेस कमिटीचे सदस्य म्हणून काम पाह लागले. आंध्र प्रदेशच्या शासनात त्यांनी अनेकविध पदे व मंत्रिपदे सांभाळली. १९७१ ते ७३ आंध्र प्रदेशचे ते मुख्यमंत्री होते. इ. स. १९७५ मध्ये इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली त्यांनी काँग्रेस कमिटीच्या महासचिवपदाची सूत्रे हाती घेतली. चंदीगडला भरलेल्या अधिवेशनात त्यांनी राजनीति व विदेशी धोरण यावर अभ्यासपूर्ण भाषण दिले.
१९७७ साली ते लोकसभेच्या निवडणुकीत . जिंकले. १९७४ मध्ये ते पार्लमेंटच्या पब्लिक अकौंटस् कमिटीचे चेअरमन झाले. १९८० मध्ये ते विदेशमंत्री बनले. १९८० ते १९८४ ते इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात होते. १९८५ मध्ये राजीव गांधींच्या मंत्रिमंडळातही ते होते. १९८९ साली ते चौथ्यावेळेला लोकसभेसाठी निवडून आले. त्यांनी विदेश मंत्रालय, गृहरक्षा, मानवविकास अशा विविध खात्यांवर मंत्री म्हणून कार्य केले आहे. २९ मे १९९१ या दिवशी ते अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झाले.
२१ जून १९९१ रोजी ते भारताचे पंतप्रधान झाले. आपल्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत त्यांनी सीटीबीटी करार स्वीकारून मुक्त अर्थव्यवस्थेचा पाया घातला. १९९६ पर्यंत ते पंतप्रधानपदी होते. परराष्ट्रमंत्री व पंतप्रधान म्हणून त्यांनी आंतरराष्ट्रीय क्षेत्रात नावलौकिक मिळवला. त्यांनी जेव्हा पंतप्रधानपद स्वीकारले तेव्हा सोने गहाण टाकून देशाचा कारभार चालू होता.
इतकी हलाखीची परिस्थिती होती. या परिस्थितीतून जनतेला कुठेही चटका बसू न देता नरसिंहराव यांनी गहाण टाकलेले सोने परत आणले आणि देशाचा रथही विकासाच्या मार्गावर आणून ठेवला. आर्थिक उदारीकरण हे अपत्य नरसिंहराव यांचेच आहे आणि याच्या पायावरच भारताची विकासाची गती सतत वाढत आहे. १९९६ च्या निवडणुकीत काँग्रेसपक्ष अल्पमतात आला आणि आघाडी शासन सत्तेवर आले. नरसिंहराव विरोधी पक्षाचे नेतत्त्व करू लागले.
ते जसे धुरंधर राजकारणी आहेत, तसेच ते साहित्य तपस्वीही आहेत. ते उत्तम तेलगू कथालेखक आहेत. तेलगू, मराठी, इंग्रजी, हिंदी अशा भारतीय भाषांबरोबरच स्पॅनिश, फ्रेंच या विदेशी भाषाही त्यांना अवगत आहेत. तेलगू ज्ञानपीठ पुरस्कार विजेते डॉ. विश्वनाथ सत्यनारायण यांची 'वेईपडिगळु' ही कादंबरी त्यांनी हिंदीत 'सहस्त्रकणा' या नावाने अनुवादीत केली आहे. मराठीतील पण लक्षात कोण घेतो' या कादंबरीचा त्यांनी तेलगमध्ये अनुवाद केला आहे. 'बहुभाषामेधावी ' अशी त्यांची ख्याती आहे. त्यांनी इनसायडर' हे कादंबरीवजा आत्मवृत्त लिहिले आहे. त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे.
पाश्चात्य साहित्याचाही त्यांनी अभ्यास केला आहे. त्यांचे अनेक भाषांवरचे प्रभुत्व व जाज्वल्य राष्ट्रनिष्ठा या दोन गोष्टी अनेक नेत्यांना व जनतेला आकर्षित करणाऱ्या ठरल्या. सुसंस्कृत, विद्वान व ज्ञानयोगी अशा नरसिंहराव यांनी देशाचा गौरव सतत वाढता खला या आर्थिक सुधारणांच्या शिल्पकाराचे २३ डिसेंबर २००४ ला निधन झाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत