INFORMATION MARATHI

dr zakir hussain information in marathi

जामिया मिलिया इस्लामिया ही दिल्लीतील ओक आदर्श शिक्षण संस्था आहे. मुलांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी स्वतः हातात ब्रश व पॉलिश घेणारे संस्थेचे चालक होते, डॉ. झाकीर हुसेन ! डॉ. झाकीर हुसेन हे उत्कृष्ट शिक्षणतज्ज्ञ, एक उत्कृष्ट शिक्षक होते, त्यांच्यासारखे क्रियाशील, सृजनशील, सुसंस्कृत व समर्पित जीवन म्हणजे आशा आकांक्षांचे स्फूर्तिस्थान होय.

डॉ. झाकीर हुसेन यांचा जन्म १८९७ मध्ये प्रसिद्ध अफगाण घराण्यात झाला. त्यांचे वडील फिदा हुसेनखान नामवंत वकील होते. १९०५ मध्ये वडिलांचे निधन झाले आणि कुटुंबाची जबाबदारी आईवर येऊन पडली. १९११ मध्ये आईही मृत्यु पावली. आईच्या मृत्युनंतर ते हसन शहा यांच्याकडे आले. त्यांनी झाकीरना चार वर्षे संस्कारक्षम शिक्षण दिले. मॅट्रिक झाल्यावर उच्च शिक्षणासाठी अलिगड येथे अँग्लो ओरिएंटल महाविद्यालयात त्यांनी नांव नोंदविले. पदवीधर झाल्यावर ते एम्. ए. झाले आणि वडिलांप्रमाणे वकिलीत नांव मिळवण्यासाठी त्यांनी कायद्याचा अभ्यास सुरू केला. 

dr-zakir-hussain-information-in-marathi
dr-zakir-hussain-information-in-marathi

शिक्षण चालू असताना ते प्रखर राष्ट्रवादी होते व परकीय सत्तेविरुद्ध होते. 'कॉमेड' हे साप्ताहिक 'अल्हिलाल' यातील ओजस्वी लिखाणाच्ना झाकीर यांच्यावर प्रभाव पडला आणि पुढे ते असहकारीतेच्या चळवळीत ओढले गेले. अलिगड येथील शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढील शिक्षणासाठी ते जर्मनीत गेले. तेथे त्यांना गेर्डा फिलिप्स वॉर्न या थोर समाजसेविका भेटल्या. पुढच्या काळात झाकीर यांनी
 
स्वत:ला 'जामिया'साठी वाहून घेतले. अर्थशास्त्राची पीएच. डी. पदवी घेऊन ते भारतात परतले.
ते भारतात परतले तेव्हा 'जामिया'ची आर्थिक परिस्थिती पार बिघडली होती. हकीम अजमल खान जामिया'चे कार्यकारी अध्यक्ष होते. त्यांनी जामिया'च्या मदतीसाठी आपली काही मालमत्ता विकली. झाकीर आपले वेतन अगदी कमी करुन घेऊ लागले. पण त्यांनी ' जामिया मिलिया'ला आकार देण्याची जबाबदारी घेतली आणि तिला आदर्श गुरुकुलाचे स्वरुप प्राप्त करुन दिले. संस्थेला त्यांनी २३ वर्षे मार्गदर्शन केले.

'जामिया'त अध्यापनाचे काम करीत असतानाच झाकीर यांनी असहकारिता चळवळीत भाग घेतला. डॉ. झाकीर यांच्या चरित्राचा अभ्यास केल्यास असे दिसून येते की त्यांना जी राष्ट्रीय कीर्ति मिळत गेली, त्याला त्यांच्या विद्वत्तेएवढीच त्यांची सचोटी व निष्कामवृत्तीसुद्धा कारणीभूत होती. 'जामिया'चे शैक्षणिक कार्य नेहरूंनाही पसंत होते. “ इस्लामी धर्म आणि संस्कृती याच्या आधारे भारतातील मुस्लीमांना शिक्षण देणे हा 'जामिया'चा उद्देश होता. धर्म या दृष्टीने इस्लामचा अर्थ फक्त एकाच ईश्वराची आराधना होय. अशा आराधनेमुळे जगातील सर्व माणसात बंधुभाव निर्माण होतो " असा त्यांचा विश्वास होता.

झाकीर यांनी लेखक व वक्ता या नात्याने जे कार्य केले होते, त्यामुळे त्यांना व्याख्याने देण्याची निमंत्रणे येऊ लागली. राष्ट्राच्या उद्धारासाठी प्रसिद्धी पराङ्मुख कार्याची जरुरी आहे, यावर त्यांचा विश्वास होता. मूलभूत शिक्षणाची योजना तयार करण्यासाठी महात्मा गांधीजींनी झाकीर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केली परंतु दुसरे महायुद्ध सुरु झाल्याने ही योजना अंमलात आली नाही.

सामाजिक दृष्टीकोनातून शिक्षण दिले जावे, यावर झाकीर यांचा नेहमीच भर होता. काम करता करता शिक्षण हा त्यांच्या शिक्षण पद्धतीचा गाभा होता. आचार हे शिक्षणाचे सर्वात महत्त्वाचे माध्यम आहे असे ते मानीत असत. त्यांचा अनेक सामाजिक, सांस्कृतिक संस्थांशी संबंध होता आणि शिक्षण पद्धती ठरविण्यास झाकीर यांनी चालना दिली. थोडक्यात शिक्षण क्षेत्रात त्यांनी भरीव कार्य केले.

१९५२ ते १९६० पर्यंत झाकीर हुसेन बिहारचे राज्यपाल होते. या काळात त्यांनी अनेक राजकीय, सामाजिक व शैक्षणिक जबाबदाऱ्या पार पाडल्या. पंडित नेहरूंच्या आग्रहामुळे ते लोकसभेचे सदस्य झाले. त्यानंतर ते उपराष्ट्रपती झाले. यावेळी राज्यसभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी उत्तम रीतीने पार पाडली. ६ मे १९६७ ला डॉ. झाकीर हसेन राष्ट्रपती म्हणून निवडून आले. त्यावेळी त्यांनी भाषण केले - “ महात्मा गांधींच्या पायाशी बसून मी माझ्या सार्वजनिक जीवनाला सुरुवात केली. जनतेने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, त्याला पात्र होण्याचा मी सदैव प्रयत्न करीन.

 हे आपले बोलणे त्यांनी सार्थ करुन दाखविले. ते तरुणांशी नेहमी सुसंवाद साधीत असत. डॉ. झाकीर हुसेन यांच्या ठायी अनेक गुणांचा सुरेख संगम झाला होता. त्यांचे बोलणे चमकदार, युक्तिवाद बिनतोड, स्वभाव सौजन्यशील होता. ते महान पंडित, विचारवंत व नामवंत लेखक होते. ते सृजनशील रसिक होते. राष्ट्रपती म्हणून निवड झाल्यावरही ते नम्रच राहिले. भपका वा सत्ता याविषयी त्यांना तिटकारा होता. आपल्या निर्मळ जीवनाने त्यांनी सर्वांपुढे एक आदर्श घालून दिला आहे. साधी रहाणी, जाज्वल्य राष्ट्रनिष्ठा व समर्पित जीवनाचा ते आधार होते. जग त्यांना एक थोर मुत्सद्दी म्हणून ओळखू लागले.

डॉ. झाकीर यांचे व्यक्तिमत्त्व मोठे व उदात्त होते. राष्ट्राच्या स्वातंत्र्य आंदोलनात ज्यांनी स्वार्थ निरपेक्ष आणि धर्मनिरपेक्ष वृत्तीने भाग घेतला, त्यापैकी झाकीर एक होते. राष्ट्रवादाचे ब्रीद ज्या मुसलमान नेत्यांनी सोडले नाही, त्या ध्येयनिष्ठ व निधर्मी पुढाऱ्यांचे डॉ. झाकीर हे अग्रणी होते. इतकी दक्ष व सृजनशील, इतकी सुसंस्कृत व समर्पित, इतकी निर्भय व सत्यान्वेषी आणि राष्ट्रीय मान्यता पावलेली ही कथा म्हणजे चैतन्याचा आणि सौख्याचा झराच होय. अशा या श्रेष्ठ व्यक्तीचा ३ मे १९६९ ला हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यु झाला. समर्पित जीवनाचा एक आदर्श काळाच्या पडद्याआड गेला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत