INFORMATION MARATHI

gulzarilal nanda information in marathi

गुलजारीलाल नंदा हे भारताचे दुसरे पंतप्रधान होत. दोनवेळा त्यांनी हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळला. भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून तनमनधन अर्पून प्रयत्न करणाऱ्यांपैकी नंदा हे एक होत. भारत उभारणीच्या काळात ते महात्मा गांधी व पंडित नेहरू यांच्याबरोबर सक्रीय भाग घेत होते. ते कट्टर गांधीवादी होते. नंदा यांचा जन्म ४ जुलै १८९८ रोजी सध्याच्या पाकिस्तानातील सियालकोट जिल्ह्यातील एका खेड्यात झाला. पूँछ येथे त्यांचे शालेय शिक्षण झाले. त्यांचे वडील शाळा मास्तर होते.

 आई वडिलांचे गडद संस्कार त्यांच्या मनावर झाले. त्यांचे शिक्षण पूर्ण व्हावे म्हणून आईने खूप कष्ट घेतले. बी. ए. ची परीक्षा झाल्यावर ते आर्य समाजाचे सदस्य बनले. त्यानंतर लाहोर, अलाहाबाद, आग्रा येथून एम. ए., एल एल. बी. पर्यंतचे शिक्षण घेतले. मुंबईतील नॅशनल कॉलेजमध्ये ते अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. १९२१ मध्ये ते असहकाराच्या आंदोलनात सहभागी झाले. गांधीजींच्या आदेशानुसार ते अहमदाबादेत मजूर संघटनेकडे लक्ष देऊ लागले.

gulzarilal-nanda-information-in-marathi
gulzarilal-nanda-information-in-marathi

१९२२ ते १९४६ या काळात नंदा वस्त्रोद्योग मजूर संघटनेचे सचिव होते. त्याच सुमारास मुख्यमंत्र्यांचे संसदीय सचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाली. १९४२ ते ४४ त्यांनी सत्याग्रह चळवळीत भाग घेतल्याने त्यांना अटकही झाली होती. १९५० मध्ये त्यांनी भारत सेवक समाज, भारत साधू समाज, नवजीवन संघ, मानवधर्म मिशन व पीपल्स फोरमची स्थापना केली. 

१९५० साली पंडित नेहरूंनी त्यांना पंचवार्षिक योजनेत सहभागी होण्यासाठी बोलाविले. पंडित नेहरूंनी देशाला आर्थिक नेतृत्व व दृष्टी दिली, त्यात सहकारी म्हणून नंदा यांचाही मोठा वाटा होता. पहिल्या पंचवार्षिक योजनेत पंडित नेहरूंनी त्यांना नियोजन आयोगाचे उपाध्यक्षपद दिले.

१९४७ ते १९५० या काळात श्री नंदा केंद्रात मजूर व गृहनिर्माण खात्याचे मंत्री होते. कस्तुरबा गांधी नॅशनल मेमोरियल ट्रस्टचे ते एक विश्वस्त होते. १९५० ते ५३ पर्यंत त्यांनी नियोजन मंडळाचे उपाध्यक्षपद भूषविले. १९५३ ते १९५७ या काळात ते केंद्रीय नियोजन पाटबंधारे व वीजमंत्री बनले. १९५७ ते ६२ ते केंद्रात नियोजन मजूर व रोजगार मंत्री होते. १९६० ते ६३ या काळात ते नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष होते. उत्तम कार्य करणारे असल्यामुळे पंडित नेहरूनी १९६२ पासून त्यांना गृहमंत्रीपद दिले होते. 

गृहमंत्री असताना काश्मीरमधील हजरतबाल आणि तामिळनाडूतील भाषाविषयक समस्या त्यांनी समाधानकारकरित्या सोडविल्या.
पंडित नेहरूंचे २७ मे १९६४ रोजी निधन झाले. तेव्हा त्यांची जागा कोण घेऊ शकणार, हा मोठा प्रश्न उभा राहिला. तेव्हा अत्यंत बुद्धिमान व कुशाग्र बुद्धीच्या श्री. गुलजारीलाल नंदा यांच्या हाती कार्यकारी पंतप्रधानपद सोपविण्यात आले. पुनः एकदा
 
हीच भूमिका त्यांना भूषवावी लागली, ती १९६६ साली. १० जानेवारी १९६६ ला लालबहादूर शास्त्री यांचे ताश्कंद येथे निधन झाले आणि पुनः पंतप्रधानपदी कोण हा प्रश्न निर्माण झाला. तेव्हाही श्री. नंदा यांनाच पंतप्रधान करण्यात आले. ते तळमळीचे कार्यकर्ते होते. देशाचे हित जपणारे होते. आपल्या कारकीर्दीत ते वेष पालटून हिंडत असत व भ्रष्टाचार अथवा अनैतिक कृत्ये करणाऱ्यांचा समाचार घेत असत. अतिशय साध्या, निरलस वृत्तीने रहाणे त्यांना पसंत होते. कर्तव्यनिष्ठा व इमानदारी हे त्यांचे स्थायीभाव होते.

श्री. नंदा हे केवळ पदे भूषवणारे पुढारी नसून त्यांनी अनेक संस्था स्थापन केल्या. उच्चस्तरीय भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी त्यांनी देशात प्रथम सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनची स्थापना केली. भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी संयुक्त सदाचार समिती स्थापन केली. कुरुक्षेत्र ङ्हलपमेंट बोर्डाचे ते सदस्य होते. १९७०-७१ ला ते केंद्रीय रेल्वेमंत्री होते. अशा त-हेने जवळजवळ ५६ वर्षे श्री. नंदा काँग्रेसमध्ये कार्यरत होते. इंदिराजींनी आणीबाणी लादली. मग त्यांनी काँग्रेसपक्ष सोडला.

 देश ऐक्यासाठी त्यांनी 'मानवधर्म मिशन' चे कामही केले. मानवधर्माचा विकास उच्च मूल्यांद्वारे व्हावा, यासाठी मानवधर्म मिशनची स्थापना झाली होती. खादीचे स्वरूप', बापूंची अनुसूयाबेनना पत्रे', द्वितीय पंचवार्षिक योजना - एक दृष्टीकोन ' अशी त्यांची अनेक पुस्तके त्यांच्या लेखणीची चुणूक दाखवतात.
शेवटपर्यंत ते राजकारण्यांना मार्गदर्शन करीत असत. दूरदर्शीवृत्तीचा खंदा शिलेदार असे त्यांचे वर्णन करता येईल. 

ते कट्टर गांधीवादी होते. देशाच्या ऐक्यासाठी व मानवधर्माच्या विकासासाठी ते निरंतर झटले. श्री नंदा यांचे राजकारण त्यांची जीवनदृष्टी आणि अर्थशास्त्राची त्यांची मीमांसा पाहून, देशासाठी झटणारे ते एक राजकीय फकीर होते, असे म्हणावेसे वाटते. १९७७ मध्ये त्यांना 'भारतरत्न' हा सर्वोच्च पुरस्कार मिळाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत